Dharma Sangrah
✕

Diabetes and heart disorders मधुमेह आणि हृदय विकार

Updated: गुरूवार, 24 ऑगस्ट 2023 (21:19 IST)
 
रक्तातील साखरेची पातळी सतत वाढल्याने संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या, धमन्या आणि नसांचे नुकसान होऊ शकते. रक्तातील उच्च साखरेची पातळीने रक्तवाहिन्यांच्या धमनींच्या भिंतींवर प्लेक तयार होतो. परिणामी रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्त पंप करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते. ही स्थिती एथेरोस्क्लेरोसिस म्हणून ओळखली जाते आणि हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो. रक्तातील उच्च साखरेची पातळी हृदयाला रक्त प्रवाह अडथळे आणते. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी त्यांच्या हृदयाच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. मधुमेहाचे व्यवस्थापन करणे आणि हृदय विकारांपासून दूर राहणे ही काळाची गरज आहे.
 
मधुमेहींनी हृदयाची काळजी कशी घ्यावी
नियमित तपासणी करा.  रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलच्या पातळीचे वेळोवेळी निरीक्षण करा. हृदयाशी संबंधित गुंतागुंत टाळण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी शिफारस केलेल्या मर्यादेत राखणे आवश्यक आहे. मधुमेहींनी दररोज घरच्या घरी रक्तातील साखर आणि रक्तदाब तपासणे आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळोवेळी घेणे योग्य राहिल. दररोज व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात राखा. चालणे, जॉगिंग, पोहणे, वेट ट्रेनिंग किंवा एरोबिक्स यासारख्या व्यायामाची निवड करा. पौष्टिक आहाराचे सेवन करा. आपल्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा.  जंक फुड, प्रक्रिया केलेले पदार्थ, तेलकट आणि हवाबंद डब्यातील पदार्थांपासून दूर रहा. हृदय निरोगी ठेवण्यासाठी धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळा. आपल्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला मधुमेहाचा विकार जडला तर स्वत:ला त्यापासून दूर ठेवण्यासाठी वेळीच आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments