deepawali
✕

शाकाहारी लोकांमध्ये असू शकतात या 5 पोषक तत्वांची कमतरता, शाकाहारी आहाराचे तोटे माहित आहे का?

Updated: गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024 (16:08 IST)
 
शाकाहारी होण्याचे तोटे
शाकाहारी आहार घेतल्यास लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि पचनाशी संबंधित समस्या टाळणे सोपे होते. त्याचबरोबर शाकाहार हा मानसिक आरोग्यासाठी चांगला असल्याचे सांगितले जाते. पण हे सर्व फायदे असूनही शाकाहारी जेवणाचे अनेक तोटे आहेत. उदाहरणार्थ काही पोषक तत्वांच्या कमतरतेचा धोका शाकाहारी लोकांमध्ये जास्त मानला जातो. शाकाहारी आहाराचे पालन करणाऱ्या लोकांमध्ये कोणते पोषक घटक कमी असू शकतात जाणून घ्या तसेच या कमतरतेशी संबंधित आरोग्य समस्या आणि लक्षणे जाणून घ्या.
 
प्रथिने कमतरता
शाकाहारी लोकांना पुरेशा प्रमाणात प्रथिने कशी मिळतील याची नेहमीच काळजी असते. शरीराला ताकद देण्यासाठी आणि स्नायू तयार करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. पण बहुतांश शाकाहारी लोकांकडे प्रथिने योग्य प्रमाणात मिळू शकतील, असा आहार योजना नाही. प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमजोरी, कमी प्रतिकारशक्ती आणि कमकुवत स्नायू यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
 
लोह कमतरता
वनस्पती-आधारित आहार घेणाऱ्यांमध्ये व्हिटॅमिन बी 12 आणि लोहाची कमतरता देखील अधिक सामान्य आहे. यामुळे लोकांना अशक्तपणा जाणवू शकतो.
 
व्हिटॅमिन डीची कमतरता
हाडे, प्रतिकारशक्ती आणि चांगल्या मानसिक आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे आणि जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी कमी होते तेव्हा हाडे दुखणे आणि नैराश्यासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता जास्त प्रमाणात आढळते.
 
कॅल्शियमची कमतरता
जे लोक शाकाहारी आहाराचे पालन करतात त्यांना देखील कॅल्शियमच्या कमतरतेचा धोका जास्त असतो. कॅल्शियमची कमतरता विशेषत: जे लोक शाकाहारी आहाराचे पालन करतात आणि दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत अशा लोकांमध्ये जास्त दिसून येते. कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडे दुखू शकतात आणि फ्रॅक्चरचा धोकाही वाढतो.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

पाडव्या दिवशी पत्नीला ओवाळणी काय द्यावी? महिलांसाठी खास सरप्राईज आयडियाज

Baked Chakli अजिबात न तळता बनवा बेक्ड चणा डाळ चकली; टेस्टी आणि सुपर हेल्दी!

Happy Dhanteras Wishes 2026 images

Abhyanga Snan 2026 Wishes in Marathi नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नान शुभेच्छा

दिवाळीत पाहुण्यांसाठी १५ मिनिटांत तयार करा केशर-पिस्ता श्रीखंड; सणाच्या जेवणाला खास रंगत

पुढील लेख
Show comments