suvichar
✕

Moon effect चंद्राचा तुमच्या आरोग्यावर खरोखर परिणाम होतो का?

Updated: गुरूवार, 24 ऑगस्ट 2023 (13:39 IST)
 
ज्योतिषशास्त्रात चंद्राचे महत्त्व
ज्योतिष शास्त्रात चंद्राला खूप महत्त्व आहे, कारण कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीसाठी ते खूप महत्वाचे असते. दुसरीकडे वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक आहे आणि तो कर्क राशीचा आहे.
 
मनाशी संबंधित चंद्र
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र आणि मन यांचा खोल संबंध आहे. एखाद्या व्यक्तीचा चंद्र कमजोर असेल तर त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतात. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीचा चंद्र बलवान असेल तर त्या व्यक्तीच्या मनावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो. याच कारणामुळे मन आणि चंद्र यांचा एकमेकांशी अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे.
 
ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर त्याला अनेक प्रकारचे मानसिक आजार त्रास देऊ लागतात. कमकुवत चंद्र असलेली व्यक्ती भयभीत राहील. अशा व्यक्तीच्या आईचे आरोग्य कमजोर राहते. दुसरीकडे जर अशक्त चंद्रावर अशुभ ग्रहांचा प्रभाव असेल तर अशी व्यक्ती आत्महत्या देखील करू शकते. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राची स्थिती योग्य नसेल तर त्याने काही उपाय करावेत.
 
या उपायांनी चंद्र मजबूत करा
चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी भगवान शिवाची पूजा करावी.
चंद्र बलवान होण्यासाठी सोमवारी शुभ्र वस्त्रे परिधान करावीत.
चंद्र बलवान होण्यासाठी मोती धारण करावा.
तुम्ही चंद्रकांत मणी, चंद्राचे रत्न देखील परिधान करू शकता.
तुमचे मन मजबूत करण्यासाठी तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी.
कमजोर चंद्र असलेल्या व्यक्तीने आपल्या मित्र आणि वडीलधाऱ्यांशी चांगले वागले पाहिजे.
याशिवाय तुमचा चंद्र कमजोर असल्याबद्दल तुम्ही अनुभवी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
 
आयुर्वेदातील चंद्र
आयुर्वेदानेही चंद्राचा प्रकाश आरोग्यासाठी फायदेशीर मानला आहे. चंद्राचे फायदे पाहून तो जगभरातील पौराणिक कथा आणि लोककथांच्या केंद्रस्थानी राहिला आहे. काही संशोधन निष्कर्ष सुचवतात की चंद्रप्रकाशाचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
 
मानसिक आरोग्यावर प्रभाव
तज्ज्ञांप्रमाणे चंद्र शरीराच्या बायोलोजिकल टाइडला प्रभावित करुन मानव व्यवहार बदलतं. पौर्णिमेचा चंद्र लोकांमध्ये चिंता आणि नैराश्य वाढू शकतं. हे सिद्ध सत्य आहे की चंद्राचा वाढता आणि कमी होत असलेल्या आकाराप्रमाणे समुद्राला भरती येते आणि कमी होते. अनेक सागरी प्राण्यांचे पुनरुत्पादक चक्र, जसे की रीफ कोरल, समुद्री वर्म्स आणि काही मासे, साधारणपणे चंद्राच्या चक्राशी जुळतात.
 
झोपेवर परिणाम होऊ शकतो
काही अभ्यासानुसार पौर्णिमा झोपेवर परिणाम करू शकते. लोक पौर्णिमेला उशिरा झोपतात आणि पौर्णिमेच्या वेळी आधीच्या रात्रींपेक्षा कमी झोपतात. 
 
पुरुष आणि स्त्रियांवर वेगवेगळे परिणाम
एका संशोधनानुसार पौर्णिमा पुरुष आणि स्त्रियांच्या झोपेवर वेगळ्या प्रकारे परिणाम करू शकते. जेव्हा पौर्णिमेचा टप्पा जवळ येतो, तेव्हा अनेक स्त्रिया कमी झोपतात आणि पौर्णिमेच्या जवळ पुरुषांना अधिक झोप येते.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

ऑनलाईन शॉपिंग करताना त्वचेच्या प्रकारानुसार फाउंडेशन, कन्सीलर आणि कॉम्पॅक्ट पावडर कसे निवडावे ते जाणून घ्या

आहारात जास्त लोणी खाण्याची सवय आरोग्याला पडू शकते महागात; जाणून घ्या दुष्परिणाम

मुलं तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलत नाहीत? पालकांनी ‘या’ चुका वेळीच सुधारा

प्रेरणादायी कथा : सकारात्मक विचार; गोष्ट ऋषी आणि दोन शिष्यांची

लोक तुमचा गैरफायदा घेत आहेत हे कसे ओळखाल? चाणक्य नीतीनुसार ५ स्पष्ट लक्षणे

पुढील लेख
Show comments