Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वांझपणा पासून मुक्तता : वांझपण जीवनशैली संबंधित समस्या

Updated: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (14:47 IST)
१) सर्वप्रथम काही सवयी जसे धूम्रपान आणि नशायुक्त पदार्थांच्या सेवनाचा कोणत्याही प्रजनन क्षमतेवर घटक प्रभाव पडू शकतो. धुम्रपानास पुरुषांमध्ये कमी स्पर्म काउंट आणि स्लगीश स्पर्म मुव्हमेंट्सही जोडले गेले आहे , तसेच महिलांमध्ये वाढते गर्भपातदेखील आहे.
अल्कोहोलचे अत्याधिक सेवन पुरुष आणि महिला दोघांच्या प्रजनन क्षमतेला प्रभावित करतो. अल्कोहोल शुक्राणूंसाठी टॉक्सिक आहे, अल्कोहोल स्पर्म काउंट कमी करतो, यौन क्षमतेस प्रभावित करतो, हार्मोन्स संतुलन बिघडवतो आणि गर्भातेचा धोका वाढवतो.
२) संतुलित आहार ज्यात कर्बोदके,प्रोटीन आणि फायबर युक्त पदार्थ खायला पाहिजे. मांसमटन ऐवजी मुबलक फायबर आणि आयर्नचा पुरवठा करणाऱ्या प्रोटीनयुक्त भाज्यांचा आहारात समावेश आसावा. कार्बोहायड्रेट्सपेक्षा कमी ट्रान्सफेन्ट आणि शुगर असलेले पदार्थ, अधिक हायफेन्ट डेअरी प्रॉडक्ट्स आणि कमी चरबीयुक्त डेअरी प्रोडक्ट्स सोबत मल्टीव्हिटॅमिन घेतल्याने महिलांमध्ये ओव्यूलेटरी विकारांच्यामुळे होणाऱ्या वांझपणाचा धोका कमी होतो. असंतुलित भोजनामुळे व्हिटॅमिन सी, फौलेट, सेलेनियम किंवा झिंकच्या कमतरतेमुळे वांझपणाचा
धोका वाढतो. सर्व महिलांमध्ये गर्भधारण करण्याअगोदर आणि गर्भधारणा करण्याच्या तीन महिन्यात स्पाईना बीफडा नामक न्यूरल ट्यूब विकारांचा धोका कमी करण्यासाठी फॉलिक एसिड इंटेक ( जे हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळीमध्ये असतात आणि सप्लिमेंटच्या रुपातसुद्धाउपलब्ध असतात.) वाढवले पाहिजे.
३) शारीरिक हालचाल आणि व्यायामाची मध्यम मात्रा व्यक्तीच्या प्रजनन क्षमता वाढवू शकतात. पण अधिक प्रमाणात व्यायाम महिलांमध्ये मासिक स्त्रावात समस्या निर्माण करू शकतो आणि पुरुषांमध्ये अंडकोशाच्या आजूबाजूला गर्मी वाढल्याने शुक्राणूंच्या उत्पादनाला प्रभावित करू शकतो.
४) वजन जास्त प्रमाणात वाढू न देणे, वांझपणातून वाचण्याचा एक श्रेष्ठ उपाय आहे. जाडेपणामुळे पुरुषांमध्ये गर्मी वाढून शुक्राणूंची मात्रा कमी होते आणि महिलांमध्ये ओव्यूलेशनवर दबाव पडतो जे वांझपणाचे कारण आहे.
इथे मुख्य संदेश हा आहे की, ओव्यूलेशनची समस्या असल्यास आपल्या रोजच्या जीवनात योग्य आहार आणि शारीरिक हालचालींचा समावेश केल्यास प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते.
५) प्रजनन क्षमतेला प्रभावित करण्याऱ्या करणाऱ्या काही चिकित्सकीय अवस्थेसाठी वार्षिक तपासणी केली पाहिजे. पेल्विक इंफ्लेमेटरी डिजीज (पीआयडी), एन्डोमेट्रियोसिस आणि सर्वाइकल कँसर सारख्या अवस्थेची वेळेवर माहिती मिळाली तर वांझपणा थांबवू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त यौन संक्रमित रोगांचे निदान आणि त्याप्रकारच्या योग्य उपचाराने प्रजनन क्षमतेला वाचवण्यास मदत मिळते.
६) डॉक्टारांद्वारे प्रिस्क्राईब केलेले औषधे आणि हर्बल उपचारांचा प्रजनन क्षमतेला फायदा होतो. अश्या औषधांविषयी प्रसूती विशेषज्ञांशी बोलणी केली पाहिजे. ह्या व्यतिरिक्त मारिजुआना आणि कोकेन सारख्या नशायुक्त औषधांचा त्याग केला पाहिजे, कारण यांचा पुरुषांमध्ये शुक्राणूंची मात्रा कमी होण्याशी आणि महिलांमध्ये वांझपणाशी संबंध आहे.
७) कीटकनाशक, लीड, भारी धातू,टॉक्सिक रसायन आणि आयोनैजिंग रेडिएशन सारख्या पर्यावरणीय विष आणि धोक्यांपासूनही वाचले पाहिजे.
८) शहरातील जलद स्पर्धात्मक युगात जीवनशैली आपले रंग दाखवीत आहे. वर्किंग कपल्समध्ये वांझपणा वाढत आहे. जास्त ताण आणि कमी झोपेमुळे वांझपणाचा धोका बळावतो आहे.ध्यान, योगा आणि दीर्घ श्वासोच्छवास घ्या, प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन सारखी अन्य तणावमुक्त पद्धतींचा वापर केल्याने तणाव कमी करण्यास मदत मिळू शकते.
Dr Hrishikesh Pai 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याची १० लक्षणे; ही चिन्हे दिसताच सावध व्हा

मुलांसाठी 'ह' अक्षरावरून ५० सुंदर आणि अर्थपूर्ण मराठी नावे

श्रावण स्पेशल: कांदा-लसूण न वापरता बनवा ५ झटपट पदार्थ

श्रावणात पचनास हलक्या, पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या ३ खास 'हेल्दी' उपवासाच्या रेसिपी

साखर न वाढता गोड खायचंय? हे 7 हेल्दी पर्याय जरूर जाणून घ्या

पुढील लेख