Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोज सकाळी केव्हा उठावे

Updated: मंगळवार, 9 एप्रिल 2024 (17:46 IST)
सकाळी केव्हा उठायला हवे-
भारतातील धार्मिक परंपरेनुसार सर्वांनी ब्राह्ममुहूर्तावर उठायला हवे. सूर्यदयाच्या पूर्व प्रहरात दोन मुहूर्त असतात. त्यातील पहिल्या मुहूर्ताला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. ब्रह्म मुहूर्तची वेळ सूर्योदयपासून 1 तास 36 मिनट पहिले सुरु होते आणि 48 मिनट पहिले समाप्त होते. स्थानीय वेळेनुसार सूर्योदयची वेळ वेगवेगळी असते. आपल्या घड्याळानुसार पहाटे 4.24 ते 5.12 ची वेळ ब्रह्ममुहूर्त आहे. अनेक लोकांची मान्यता आहे की, सकाळी 04 ते 5:30 मध्ये अंथरून सोडून द्यावे. काही शास्त्रज्ञाच्या मते, सकाळी 05:30 से 06 मध्ये उठणे चांगले असते. 
काही एक्सपर्ट मानतात की, सकाळी 06 ते 07 मध्ये उठणे चांगले असते. एक्सपर्ट यांच्या मतानुसार रात्री 10 वाजता झोपलेले चांगले असते. व्‍यस्‍त जीवनशैलीमध्ये रात्री 11 वाजता झोपणे आणि सकाळी 6 वाजता उठणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जाते. 
 
का उठावे सकाळी लवकर- 
जर तुम्ही साधक असाल तर सकाळी लवकर उठायला हवे. कारण यावेळी ऑक्सिजन भरपूर प्रमाणात असतो आणि वातावरण पण आध्यात्मिक असते. जर तुम्ही तुमच्या जीवनात काही लक्ष ठरवले असेल तर तुम्ही सकाळी उठले पाहिजे. ज्यामुळे दिवसभरातील काम करण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळेल.
 
सकाळी लवकर उठण्याचे फायदे- 
वैज्ञानिक शोधानुसार ब्रह्ममुहुर्तमध्ये वायुमंडल प्रदूषणरहित असते. या वेळी वायुमंडलमध्ये ऑक्सीजन (प्राणवायु)चे प्रमाण सर्वात जास्त (41 प्रतिशत) असते. जो फुफुसांच्या शुद्धीसाठी चांगला असतो. शुद्ध वायु मिळाल्याने मन, मेंदू आरोग्यदायी राहतो. वैज्ञानिकांच्या मते, या वेळी ऑक्सीजन 41 प्रतिशत, कमीतकमी 55 प्रतिशत नाइट्रोजन आणि 4 प्रतिशत कार्बन डाईआक्साइड गॅस असते. सूर्योदय नंतर वायुमंडल मध्येऑक्सीजन कमी आणि कार्बन डाईआक्साइड वाढतो. आयुर्वेद अनुसार या वेळी जी हवा वातावरणात वाहते तिला अमृततुल्य संबोधले आहे. ब्रह्ममुहूर्त मध्ये उठून फिरल्याने शरीरात संजीवनी शक्तिचा संचार होतो. ही वेळ अध्ययनसाठी देखील उत्तम सांगितली गेली आहे. कारण रात्री आराम झाल्यानंतर आपण जेव्हा सकाळी उठतो. शरीरात आणि मेंदूमध्ये ऊर्जा आणि ताजेपणा निर्माण झालेला असतो. सकाळी ऑक्सिजनचे प्रमाण देखील जास्त असते. ज्यामुळे केलेले अध्ययन लक्षात राहते.   

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

Pithori Amvasya पिठोरी अमावस्या दिवशी दाखवला जाणारा मुख्य व पारंपरिक नैवेद्य

बाप्पासाठी खुसखुशीत साटोरी घरी तयार करा, आठवडाभर खस्ता राहतील

Bail Pola Naivedyam बैल पोळ्याच्या दिवशी दाखवला जाणारा मुख्य व पारंपरिक नैवेद्य

Cabbage Peas Stir Fry स्वादिष्ट आणि पौष्टिक सुकी भाजी ''कोबी मटार''

शरीरातील साखर अचानक कमी झाल्यास काय होते? ही लक्षणे ओळखा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या उपाययोजना

पुढील लेख
Show comments