Bitter Things To Eat : आरोग्यदायी जीवनशैलीसाठी चांगला आहार महत्वपूर्ण असतो. चांगल्या आरोग्यासाठी नेहमी कारले, डार्क चॉकलेट, मेथी यांसारखे आहार सेवन करावे असे सांगितले जाते. जे खूपच कडू असतात. यांच्या चवीमुळे आपण यांना सेवन करणे टाळतो. पण या वस्तु आरोग्यासाठी खूप चांगल्या आहेत. चला तर जाणून घेऊ या कडू असलेल्या वस्तुंबद्द्ल ज्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
1. लिंबू (Lemon): लिंबामध्ये विटामिन C अधिक प्रमाणात असते. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. हे शरीराला ऑक्सीजन फ्री रडिकल्स पासून वाचवण्यासाठी मदत करतो आणि आजारांशी लढण्याची क्षमता वाढवतो. लिंबांचा उपयोग पाचन क्रिया सुधारण्यासाठी चांगला असतो. तसेच वजन कमी करण्यासाठी देखील लिंबू मदतगार असतो.
2. कारले (Bitter Gourd): कारले विटामिन C, B1, B2, B3, फोलेट, आयरन, मैग्नीशियम, फॉस्फोरस, जिंक, पोटैशियम, कालियम आणि बीटा कैरोटिनचा चांगला स्त्रोत आहे. कारले आपल्या शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून सुरक्षित ठेवते. तसेच मधुमेहला नियंत्रित ठेवण्यासाठी कारले मदत करते.
3. मेथी (Fenugreek): मेथीच्या बियांमध्ये अनेक लाभ असतात. मेथीच्या बिया या रक्ताला शुद्ध करण्याचे काम करतात आणि अनेक प्रकारच्या संक्रमण सोबत लढायला मदत करते.
4. कडुलिंब (Neem): कडुलिंबाचे पाने आरोग्यवर्धक असतात. हे रक्त शुद्ध करण्याचे काम करतात. तसेच त्वचेचे रक्षण करतात मधुमेह नियंत्रित ठेवतात. अनेक प्रकारच्या संक्रमण सोबत लढायला कडुलिंबाचे पाने मदत करतात.
5. ब्रोकली (Brocoli): ब्रोकली मध्ये विटामिन A ,C, असे अनेक पोषकतत्व असतात. ब्रोकलीचा कडवटपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसाचा उपयोग करू शकतात. बद्धकोष्ठता आणि इतर समस्या दूर करण्यासाठी ब्रोकली मदत करते.
6. ग्रीन टी (Green Tea): ग्रीन टी ची चव देखील कडु असते पण ग्रीन टी आरोग्यासाठी गुणकारी मानला जातो. वजन कमी करण्यासाठी आणि मेटाबॉलिज़्मला चांगले करण्यासाठी तसेच पाचन क्रिया सुरळीत करण्यासाठी आणि हृदयाला आरोग्यदायी ठेवण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर असतो.
7. डार्क चॉकलेट (Dark Chocolate): डार्क चॉकलेट चवीला कडू असते पण आरोग्यासाठी फायदेशीर असते. सोबतच मूड स्विंग च्या समस्येपासून दूर राहण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन खूप चांगले असते. विविध आजारांना दूर ठेवण्यासाठी तुमच्या डाइट मध्ये वरील सात वस्तु सहभागी करा. तसेच योग्य प्रमाणात यांचे सेवन करावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik