1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : रविवार, 31 मार्च 2024 (17:55 IST)

त्वचेसाठीच नाही तर, आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे गुलाब

डोळ्यांसाठी गुलाबजल खूप फायदेशीर असते. याचा उपयोग तणाव आणि चिंता दूर करतो. तसेच गुलाब पाचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. आयुर्वेदमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचे विशेष महत्व आहे. अनेक प्रकारे याचा उपयोग केला जाऊ शकतो. आयुर्वेदमध्ये उपचार करतांना गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग ताजेपणा, शांती आणि शारीरिक संतुलन वाढवण्यासाठी केला जातो. तसेच त्वचेसंबंधित अनेक समस्यांसाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग करतात. 
 
1. त्वचेसाठी उपयोग- गुलाबाच्या पाकळ्यांचा त्वचेसाठी उपयोग केला जातो. गुलाबजला त्वचेवर लावल्यास ताजेपणा येतो तसेच चमक येते. हे त्वचेला मऊ आणि सुंदर बनवायला मदत करते व सूज देखील कमी करण्यास मदत करते. 
 
2. डोळ्यांसाठी फायदेशीर- गुलाब फक्त त्वचेसाठीच नाही तर डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाकळ्या डोळ्यांना शीतलता प्रदान करतात तसेच डोळ्यांना स्वच्छ करण्यासाठी देखील गुलाबजल लाभदायक आहे. याच्या उपयोगमुळे डोळ्यांची जळजळ तसेच डोळे लाल होणे या समस्या कमी होतात. 
 
3. चिंता आणि तणावापासून आराम- गुलाबाच्या पाकळ्यांमधील विशेष सुंगंध तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी मदत करतो. पाकळ्यांमधील सुंगंध मेंदूला शांत करण्यासाठी तसेच मनाला स्थिर करण्यासाठी आणि मनोवैज्ञानिक संतुलन वाढवण्यासाठी केला जातो .
 
4. पाचन आणि आतडे यांना संतुलित करण्यासाठी मदतगार- गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग पाचन आणि आतड्यांना संतुलित करण्यासाठी केला जातो. हे पाचनतंत्रला सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. आतड्यांच्या प्रभावी क्रियेला सुनिश्चित करतात. 
 
5. संधिवातसाठी उपयोगी- आयुर्वेदमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांना संधिवात(आर्थराइटिस) आणि या संबंधित शारीरिक समस्यांसाठी उपयोगी मानले जाते. यांचा तेलाच्या रुपात उपयोग केल्यास संधिवाताचे दुखणे कमी होते.  
 
6. मेंदु संबंधित समस्यांसाठी- गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग मेंदु संबंधित समस्या जसे की मानसिक तणाव, उदासीनता आणि चिंता कमी करण्यासाठी केला जातो. गुलाबाचा सुगंध मानसिक शांति आणि सुखद अनुभव प्रोत्साहित करतो .
 
7. सामान्य आरोग्यदायी लाभ- गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग आरोग्य आणि ताजेपणा वाढवण्यासाठी केला जातो, यांना गरम पाण्यासोबत हलक्या गुलाबी चाहा सोबत सेवन केले जाऊ शकते. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि आरोग्य देखील चांगले राहते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik