Dharma Sangrah
✕

चुकूनही सोबत खाऊ नये ही फळे, तब्येत बिघडू शकते

Updated: मंगळवार, 15 मार्च 2022 (09:00 IST)
 
केळी आणि पपई एकत्र खाऊ शकतो का?
केळी आणि पपई एकत्र खाणे फायदेशीर आहे की नाही, हे तुमच्या पचनसंस्थेवर अवलंबून असते, असे आहारतज्ज्ञ सांगतात. अनेकांची पचनशक्ती कमजोर असते, त्यामुळे केळी आणि पपई एकत्र खाल्ल्यास त्यांच्या समस्या वाढतात. ज्यांची पचनशक्ती चांगली असते त्यांना हा त्रास जाणवत नाही.आयुर्वेदानुसार केळी आणि पपई हे एकमेकांचे विरुद्ध फळ मानले जातात. अशा परिस्थितीत आयुर्वेद देखील त्यांना एकत्र खाण्याची शिफारस करत नाही. हे एकत्र खाल्ल्याने पचनाशी संबंधित आजार वाढतात. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अपचन, उलट्या, मळमळ, गॅस आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
 
या लोकांनी केळी आणि पपई खाऊ नये- या मिश्रणाशिवाय दमा किंवा श्वसनाचे कोणतेही आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पपईचे सेवन करावे. पपईमध्ये पपन नावाचे तत्व असते, ज्यामुळे काही लोकांना ऍलर्जीची तक्रार असते. जर त्याने पपई खाल्ली तर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर काविळीच्या रुग्णांनाही पपई न खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असलेले पपेन आणि बीटा कॅरोटीन काविळीची समस्या वाढवू शकतात. याशिवाय गर्भवती महिलांना पपईचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. पपई आणि केळीचे मिश्रण देखील गर्भवती महिलांसाठी योग्य नाही. सर्दी झाली तरी केळी आणि पपई खाणे टाळावे. कारण यामुळे तुमची समस्या वाढू शकते.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भूकंप अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे? शैक्षणिक पात्रतेपासून पगारापर्यंत जाणून घ्या सर्वकाही

सिमला मिरची खाण्याचे फायदेच नाही, तर तोटेही आहेत! 'या' लोकांनी सेवन करताना घ्यावी विशेष काळजी

दमा आणि ब्राँकायटिसची लक्षणे सारखीच? दोन्ही आजारांमधील महत्त्वाचे फरक जाणून घ्या

तुम्हाला वारंवार सर्दी होते का? हे आयुर्वेदिक उपाय करून पहा!

आरोग्यासाठी सुपरफूड नाचणीच्या ५ चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीस

पुढील लेख
Show comments