शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (17:04 IST)

Health Tips :नेहमी थकवा जाणवतो का? तर या टिप्स अवलंबवा

प्रत्येक कामात जीव घाबरतो  का?  सतत पडून राहावेसे वाटते का? असं घडत असेल तर यामध्ये आपण एकटे नाही आहात. बऱ्याच  लोकांना दररोज समान लक्षणांचा त्रास होतो. स्वतःला कसे रिचार्ज करायचे याच्या काही टिप्स जाणून घ्या.
 
1  झोपेकडे लक्ष द्या: शरीराला किमान 8 तासांची झोप आवश्यक आहे असे म्हटले  जाते. झोपण्यापूर्वी शरीर ताणून मन शांत करा. तसेच, झोपण्यापूर्वी किमान एक तास कोणत्याही स्क्रीनकडे न पाहण्याचा सल्ला दिला जातो.
 
2 मानसिक तणाव आपले शरीर थकवतो: आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.  मन आणि शरीराला आराम करण्यासाठी ध्यान किंवा व्यायाम करून पहा.
 
3 आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. दिवसातील दिलेल्या वेळेत अभ्यास करा किंवा काम करा आणि त्या वेळेत  मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
 
4 आपण कमी बोलता का? जेव्हा काही वेळ गर्दीत गेल्यावर बोलून कंटाळा येतो का? या साठी असा सल्ला दिला जातो की तुम्ही स्वतःला दररोज काही तास वेळ द्या आणि स्वतःला रिचार्ज करा.
 
5 मनाला छंदाने रिचार्ज करा. आठवड्यातून काही तास स्वतःसाठी आणि आवडीच्या  छंदासाठी बाजूला ठेवा. हे काहीही असू शकते - गाणे, नृत्य, चित्रकला किंवा बागकाम. छंद आपले शरीर सक्रिय करण्यास आणि आपले मन रिचार्ज करण्यास मदत करतात.
 
6 सहलीला जा: प्रवास आपले मन आणि आत्मा ताजेतवाने करतो आणि आपल्याला कामावर परत जाण्यासाठी नवीन प्रेरणा देते.