गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (22:14 IST)

Holi 2022:होळीत गरोदर महिलांनी चुकूनही हे काम करू नये, स्वतःची काळजी अशी घ्या

होळी हा आनंदाचा सण आहे.लोक होळीची तयारी करत आहेत. या उत्सवात लोक त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रांना भेटतात. ते एकमेकांना रंग लावतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची चव घेतात. रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा जरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे तरी ही अद्याप कोरोना गेला नाही. कोरोनाकाळात होळी साजरी करताना लहान मुलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, गरोदर महिलांनी स्वतःची काळजी घेणे महत्वाचे आहे. विशेषतः गरोदर महिलांनी स्वतःची काळजी घेणे महत्वाचे आहे. जेणे करून या आनंदाचा सणात कोणताही व्यत्यय येऊ नये. या होळी ला गरोदर महिलांनी स्वतःची अशा प्रकारे काळजी घ्यावी .
 
1 गरोदर महिलांनी नाचू नये- होळीचा सण उत्साहाचा आनंदाचा आणि जल्लोषाचा आहे. अशा परिस्थितीत लोक या दिवशी मोठया आवाजात डीजे लावतात आणि नाचतात. गरोदर महिलांनी उत्साहात येऊन नाचणे टाळावे. एवढेच नाही तर ज्या ठिकाणी लोक डीजे वर गाणे लावून नाचत असतील त्या ठिकाणापासून दूर राहा. इतर लोक  नाच करताना त्यांचा धक्का आपल्याला लागू शकतो. 
 
2 कोरड्या रंगानी होळी खेळा- काही लोक होळी कोरड्या रंगानी अबीर गुलालानी खेळतात  तर काही लोक पाण्याने होळी खेळतात. गरोदर बायकांनी पाण्याने होळी खेळणे टाळावे. पाण्यामुळे सर्वत्र ओलसर झाले असते. अशा परिस्थितीत पाय घसरू शकतो. 
 
3 हर्बल रंग वापरा- कोरडी होळी खेळताना रंगाच्या गुणवत्ते कडे विशेष लक्ष द्या. अनेक रंग रासायनिक घटकांचा वापर करून बनवतात. या रंगांमुळे ऍलर्जीचा धोका होऊ शकतो. म्हणून गरोदर स्त्रियांनी होळीला हर्बल रंगाचा वापर करावा. 
 
4 गर्दीत जाणे टाळा - जरी कोरोना निर्बंध काढण्यात आले आहे. तरी  कोरोना अद्याप गेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.
अशा परिस्थितीत कमीत कमी लोकांना भेटा आणि गरोदर महिलांनी गर्दीत जाणे टाळावे. लोकांना भेटताना मास्कचा वापर करावा.