1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (21:39 IST)

Happy Holi 2022: कोरोनाच्या धोक्यात मुलांच्या होळी खेळण्याच्या पद्धतीत अशा प्रकारे बदल करा

Happy Holi 2022: Change the way children play Holi in the threat of corona Happy Holi 2022: कोरोनाच्या धोक्यात मुलांच्या होळी खेळण्याच्या पद्धतीत अशा प्रकारे बदल करा  Marathi Health Tips Arogya Marathi Lifestyle Marathi  In Webdunia Marathi
भारतात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. सणांबद्दल सर्वांनाच उत्सुकता असली तरी मुलांचा उत्साह मात्र वेगळाच असतो.  सध्या कोरोना आणि ओमिक्रॉनचा धोका अद्याप संपलेला नाही अशा परिस्थितीत मुलांनी  होळीचा सण साजरा करण्याची काळजी पालकांना वाटू शकते. आपण मुलांना होळी खेळण्यापासून रोखू शकत नाही पण कोरोनाच्या धोक्यात काही गोष्टी लक्षात ठेवल्यास मुलांना होळीमध्ये ही  सुरक्षित ठेवता येईल. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 फुलांची होळी-जर मुलांनी होळी खेळण्याचा आग्रह धरला तर पाणी किंवा रंगांऐवजी फुलांची होळी घरातच खेळता येईल. मुलांसाठी रंगीबेरंगी फुले आणा आणि त्यांना घरीच आरामात फुलांशी खेळण्यास प्रोत्साहित करा. त्यामुळे मुलांनाही होळीमध्ये काहीतरी नवीन करायला मिळणार आहे. घरही जास्त घाण होणार नाही आणि होळीच्या सणात  कोरोनाच्या धोक्यापासून संरक्षण मिळेल.
 
2 रंगाचा क्रियाकलाप-मुलांना होळी खेळण्याच्या नवीन पद्धतीबद्दल सांगा. एकमेकांना रंग लावण्या ऐवजी, पाण्याने होळी खेळण्याऐवजी किंवा इतर मुलांबरोबर किंवा मित्रांसह होळी खेळण्यासाठी बाहेर पाठ्वण्या ऐवजी , आपण  त्यांना रंगांच्या  इतर क्रियाकलापांबद्दल सांगू शकता. उदाहरणार्थ, कलर बॉक्समध्ये रंग भरा, त्यांना चांगल्या प्रकारे चित्र रंगवायला प्रेरित करा. चांगल्या प्रकारे चित्र रंगविल्यावर त्यांना  भेटवस्तू देण्याचे आमिष देखील द्या.
 
3 व्हर्च्युअल होळी- कोरोनाच्या काळात व्हर्च्युअल अॅक्टिव्हिटी खूप वाढली. व्हर्च्युअल पद्धतीनेही होळी साजरी करता येते. यासाठी होळीमध्ये मुलाला त्याच्या मित्रांशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलायला लावा.  त्याला ही त्याच्या मित्रांना पाहून आनंद होईल आणि होळीच्या निमित्ताने तो इतर मुलांसोबत व्हर्च्यूवल पद्धतीने व्यस्त राहील.
 
4 मुलांना व्यस्त ठेवा -मुले मोकळे असतील तर ते  होळी खेळण्याचा आग्रह धरतील. पण जर आपण त्याला होळीच्या इतर कामांमध्ये व्यस्त ठेवले तर तो  रंग खेळण्यापेक्षा घरातील इतर कामांचा आनंद घेऊ शकेल. अशा परिस्थितीत, आपण त्यांना घरातील कामांमध्ये गुंतवून ठेवू शकता. त्यांना काही जबाबदारी द्या ,जेणे करून तो त्या  कामात आनंदाने व्यस्त होतील.