बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

सफरचंद आणि केळी खाण्याची योग्य वेळ

फळांचे सेवन करणे आमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतं, कारण याने कमजोरी दूर होते. तसेच आजारी पडल्यावर डॉक्टर्सदेखील फळं खाण्याचा सल्ला देतात. फळं खायचे हा विचार करून अनेक लोकं दिवसातून कधी फळांचे सेवन करतात परंतू असे करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. तर जाणून घ्या योग्य वेळ:
 
सकाळी नाश्ता करताना सफरचंद खाणे सर्वात योग्य ठरेल. यात पेक्टिन नामक तत्त्व आढळतं ज्यामुळे बीपी लेवल लो होतं आणि कोलेस्टरॉल कमी करण्यात देखील मदत करतं. सफरचंद रात्री खाणे टाळावे कारण हे पचण्यात कठिण जातं आणि याने अॅसिडीटीचा त्रास उद्भवू शकतो.
 
तसेच केळी खाण्याची योग्य वेळ सांगायची तर दुपारच्या जेवण्यानंतर. याने शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढते. रात्री केळी खाण्याने पचण्यात त्रास होतो.
 
तसेच बटाटा किंवा बटाट्याचे पदार्थ खाण्याची इच्छा असल्यास ब्रेकफास्ट ही वेळ सर्वात उत्तम आहे. कारण यातील हाय कॅलरीज. रात्री याचे सेवन केल्याने गॅसची समस्या आणि लठ्ठपणा वेगाने वाढू शकतो. 
 
आता प्रश्न हा आहे की रात्री काय सेवन करू शकतो तर दूध पिण्यासाठी रात्रीची वेळ योग्य आहे. याने चांगली झोप येते. तरी आपण व्यायाम करत असाल तर सकाळी दूध पिणे योग्य ठरेल.