ganesh chaturthi

स्तनाचा कर्करोग नसल्याची खात्री करून घ्या, घरीच तपासणी करा

Updated: शनिवार, 11 जानेवारी 2020 (15:28 IST)
 
डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी आणि तपासणी करण्यापूर्वी आपण स्वतः आपल्या स्तनाची तपासणी करून प्रारंभिक लक्षणे ओळखू शकता. स्तन कसे तपासायचे हे जाणून घ्या, काही चरणां मध्ये. 
 
1 आरशासमोर उभे राहा 
आरशासमोर उभे राहून खोलीत भरपूर प्रकाशात येत असल्यास आपले खांदे सरळ ठेवा, हातांना सैल सोडा, आणि स्तनाच्या आकारात काही फरक आहे का बघा, किंवा कोणती ही विकृतीची तपासणी करा.  
 
2 स्तनाग्रांची तपासणी 
स्तनानंतर, स्तनाग्रांची तपासणी करा. त्यात कुठल्याही प्रकारचे डाग असल्यास किंवा त्यांच्या रंगात अंतर आहे का बघा. नंतर स्तनाग्रांना दाबून बघा. द्रवस्त्राव होत तर नाहीये याची तपासणी करा. 
 
3 काखेची तपासणी
स्तनांच्या कर्करोगासाठी केवळ स्तनच नाही तर काखेचीही तपासणी आवश्यक आहे. यासाठी आपला हात वर करा आणि आपल्या काखांचे परीक्षण करा. काखेत बोट फिरवा आणि तेथे कुठली  गाठ तर नाही हे तपासा. दोन्ही काख पूर्णपणे तपासा.
 
4 स्तनांच्या ऊतकांची तपासणी 
आपल्या स्तनाच्या ऊतकांना हळुवार दाबा आणि काखेच्या भागापासून स्तनापर्यंत प्रत्येक ऊतक नीट तपासून पहा की त्यात कोणत्याही प्रकाराची गाठ किंवा इतर काही समस्या तर नाहीत. 
 
5 मासिक पाळीच्या 3-5 दिवसांनंतर तपासा 
मासिक पाळीच्या 3 ते 5 दिवसांनंतर स्तन तपासणीसाठी सर्वोत्तम काळ असतो. ह्याचे कारण असे आहे की मासिक पाळीच्या 5 दिवसांनंतर स्तनांवर सूज नसते आणि त्यांचे परीक्षण करणे सोपे जाते. 
 
दरमहा स्वत: साठी 10 मिनिटे घ्या आणि आपल्या स्तनाची तपासणी करा. आपण नियमितपणे स्तनाचे परीक्षण करणे सुरू करा आणि काहीही विचित्र आढळल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे विसरू नका.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

गुडघ्यांसाठी फायदेशीर ‘जानू नमन आसन’; योग्य पद्धतीने कसे करावे? जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : जे मला प्रिय आहे

मोदक पायसम खीर: पारंपरिक आणि चवदार दक्षिण भारतीय फ्युजन रेसिपी Modak Payasam Kheer

शतदा प्रेम करावे : मंगेश पाडगांवकर मराठी कविता

केस गळतीची ७ कारणे, उपाय आणि योग्य आहार: त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला

पुढील लेख
Show comments