शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (11:12 IST)

Drumstick शेवग्याच्या शेंगेमध्ये आहेत औषधी गुण

शेवग्याची शेंग खाण्याचे 10 फायदे, तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
 
1. मधूमेह, लठ्ठपणा आणि अस्थमाच्या रुग्णांसाठी शेवग्याची शेंग फायदेशीर आहे.
 
2. ड्रमस्टिकमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स दृष्टी आणि रेटिनाशी संबंधित समस्यांवर फायदेशीर आहेत.

3. याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
 
4. शेवगाच्या शेंगांमध्ये नियाझिमायसिन घटक आढळतो, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी तयार होण्यापासून बचाव होतो.
 
5. यामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडे मजबूत करतात.
 
 
6. ड्रमस्टिकमध्ये फायबरचे प्रमाण आढळते, ज्यामुळे लवकर भूक लागत नाही.
 
7. जर लोहाची कमतरता असेल तर पालकाऐवजी याचेही सेवन केले जाते. याच्या सेवनाने रक्तही शुद्ध राहते.
 
8. याच्या सेवनाने नैराश्य, अस्वस्थता आणि थकवा जाणवत नाही.
 
9. या शेंगांमध्ये असलेले व्हिटॅमिन-बी पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करते.
 
10. ड्रमस्टिकमध्ये असलेले घटक त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.