Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Health Tips : हे खा, बुद्धी वाढवा

Updated: बुधवार, 11 ऑक्टोबर 2017 (10:22 IST)
अक्रोड: अक्रोड एकमेव असा मेवा आहे ज्यात मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स सर्वाधिक प्रमाणात आढळतात. ओमेगा-3 मुळे मेंदूत न्यूरोट्रांसमिशन सुरळीत होतं ज्याने मेंदू जलद कार्य करतं. मेंदूच्या स्वास्थ्याकरता अक्रोड हे अत्यंत उपयुक्त आहे.

सालमन मासोळी: मनुष्याच्या मेंदूचा जवळपास 60 टक्के भाग फॅट्सने निर्मित असतो. याचा अर्थ आहे की मेंदूला योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी सतत फॅटी ऍसिडची गरज असते. सालमन मासोळी ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि डोकोसाहेक्सिनॉइक ऍसिड (डीएचए) चा एक उत्तम स्रोत आहे, जो अल्झायमर रोगाला प्रतिबंधित करतो.



टोमॅटो: एंटीऑक्सीडेंट्स आणि लाइकोपीनचा उत्तम स्रोत असल्यामुळे टोमॅटोच्या सेवनाने मेंदू तल्लख होतो. फ्री रेडिकल मेंदूला नुकसानदायक असून याने डिमेंशिया होऊ शकतो. म्हणूनच रोज टोमॅटो खाल्ल्याने पर्याप्त एंटीऑक्सीडेंट्स मिळतात, जे फ्री रेडिकल्सला दूर ठेवतात.

ग्रीन टी: स्वित्झर्लंडच्या बाजेल विद्यापीठात झालेल्या एका संशोधनात मेंदूसाठी हिरवा चहा घेणे उत्तम असल्याचे आढळले आहेत. हिरव्या चहामुळे मेंदूतील रक्तकोशिका मजबूत होतात. ग्रीन टी सेवन केल्याने डिमेंशिया आणि पार्किन्सन रोग होत नाही.

डार्क चॉकलेट:  यात शरीर आणि मेंदूसाठी आवश्यक असलेले एंटीऑक्सीडेंट्स आढळतात. डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे फ्लैविनॉयड्स मेंदूमधील रक्ताभिसरण सुधारतात.

ब्लूबेरी: या फळात फ्लैविनॉयड असतं. याचं सेवन करणार्‍याचे मेंदू जलद कार्य करतं. याने मेमरी शॉर्प होते आणि मेंदूला नुकसानदायक ठरणारे फ्री रेडिकल कमी होतात.


पालक: पालकात भरपूर पोटॅशिअम असतं. याने विचार करण्याची क्षमता वाढते. पालकात एंटीऑक्सीडेंट्सच्या व्यतिरिक्त मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन इ असल्याने डिमेंशिया होण्याची शक्यता नसते.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

Happy Raksha Bandhan Images for Brother रक्षाबंधनाच्या भावाला द्या या खास शुभेच्छा

उपवासासाठी एक उत्तम आणि चवदार रेसिपी ''Green Sabudana Vada''

शौचातून रक्त येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका गंभीर आजारांचे लक्षण होऊ शकतात

Power Grid Vacancy : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये २७० शिकाऊ पदांसाठी भरती, अर्ज २५ ऑगस्टपासून सुरू; पात्रता जाणून घ्या

सणासुदीच्या काळात मेकअप करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments