बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

वजन कमी करण्यासाठी 10 उकळलेल्या भाज्या

आपण असे ऐकले असेल की भाज्यांना जास्त शिजवल्याने किंवा उकळल्याने त्यातील पौष्टिक तत्त्व नष्ट होतात परंतू काही फळ, भाज्या अश्याही आहे ज्या उकळवून खाल्ल्याने फायदा होतो. जाणून घ्या कोणत्या आहे या भाज्या:
कोबी - कोबी उकळवून खाल्ल्याने स्वाद तर वाढेलच याबरोबरच पौष्टिकातही वाढेल. आपल्या वजन कमी करायचे असल्यास कोबी उकळवून खाल्ल्याने किंवा याच सूप पिण्यानेही फायदा मिळतो.
पालक - पालक कच्चा खाण्यापेक्षा उकळून किंवा भाजी बनवून खाण्याने दुप्पट पोषण मिळतं. तज्ज्ञांप्रमाणे हिरव्या पालेभाज्या उकळून खाल्ल्याने दुप्पट ताकद मिळते. विशेषतः मेथी आणि पालक.

फुलकोबी -  फुलकोबी उकळून खाणे फायदेशीर आहे. वाफेत शिजवलेली फुलकोबी पौष्टिक असते. वाफवल्याने त्यातील पोषक तत्त्व ‍कमी होत नसून उलट त्यात वृद्धी होते.
स्वीट कार्न - उकळल्यावर स्वीट कार्न स्वादिष्ट तर लागतातच यातील पोषण ही दुप्पट होऊन जातं. यात आढळणारे फायबर्स बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात.

बीन्स - बीन्स उकळवून खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे थोडेसे उकळवून यावर मीठ आणि काळी मिरी भुरभुरून खाल्ल्याने किंवा याचा सूप पिण्याने मधुमेहापासून मुक्ती मिळते. याने लठ्ठपणाही नियं‍त्रित होतो.
बीट - तसं तर बीट सलाड म्हणून कच्चा खाल्लं जातं किंवा याचा ज्यूस बनविला जातो. परंतू रक्ताची कमी किंवा मासिक पाळी संबंधी समस्या दूर करण्यासाठी दररोज एक बीट उकळून खाणे अधिक फायद्याचे आहे. परंतू याला 3 मिनिटांपेक्षा अधिक उकळू नका.

गाजर - गाजर उकळून खाल्ल्याने यातील गुण वाढतात. गाजर कापून मीठ आणि काळी मिरीसह पाण्यात उकळून खावं. हे डोळे आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी हे खूप उपयोगी आहे.
रताळे - फायबर आणि कार्ब याने भरपूर रताळे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त हे शुगरसाठी फायदेशीर आहे. कच्चं खाण्याऐवजी उकळून खाल्ल्याने याचे चांगले परिणाम मिळतील.

ब्रोकोली - ब्रोकोली उकळल्याने यातील पोषक तत्त्वांची वृद्धी होते. उकळी घेतल्यावर यातील स्वादही वाढतो. भरपूर लाभासाठी उकळून खा. हवं असल्या यात ऑलिव्ह ऑइल मिसळू शकता.
बटाटे - सामान्यतः: बटाटे उकळून बनवले जातात. उकळल्यावर दुप्पट पोषण मिळतं. परंतू अती उकळण्यापासून वाचवे.
या भाज्या उकळून सेवन केल्याने शरीर आंतरिक रूपाने मजबूत होत आणि लठ्ठपणा कमी होतो.