suvichar

कॉम्प्युटरवर जास्त काम करणाऱ्यांमध्ये डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत, हे उपाय अवलंबवा

Updated: शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (15:11 IST)
 
स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यामुळे डोळ्यांच्या समस्यांना वैद्यकीय भाषेत 'डिजिटल आय स्ट्रेन' असे म्हणतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सहसा आपण या समस्येकडे फारसे लक्ष देत नाही, परंतु एकदा का ती वाढू लागली की त्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
 
जे लोक दररोज संगणकावर जास्त वेळ घालवतात त्यांना त्यांच्या डोळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यामध्ये काही अतिशय सोपे उपाय आपल्याला मदत करू शकतात,
 हे उपाय डोळ्यांना गंभीर समस्यांपासून वाचवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
 
डिजिटल आय स्ट्रेनमुळे होणारा त्रास -
डिजिटल स्ट्रेनचा त्रास हा आजच्या काळापेक्षा आधीची सामान्य समस्या आहे, कारण जवळजवळ प्रत्येकजण दैनंदिन जीवनात स्क्रीन वापरतो. सुमारे 50 टक्के लोक अशा समस्यांना बळी पडतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे दीर्घकाळासाठी आपल्या दृष्टीला हानी पोहोचवते याचा पुरेसा पुरावा नसला तरी, यामुळे डोळे दुखणे, लालसरपणा, टोचणे  आणि डोळे कोरडे पडणे यासह डोळ्यांच्या विविध समस्या उद्भवू शकतात.
 
* 20/20/20 या नियमाचे पालन करा
आपले डोळे दिवसभर सतत काहीही पाहण्यासाठी डिझाइन केलेले नाहीत, असे आरोग्य तज्ञ स्पष्ट करतात. यामुळेच जे लोक सतत स्क्रीन पाहतात त्यांना डोळ्याच्या संबंधित अनेक समस्या उदभवू शकतात. हे टाळण्यासाठी 20/20/20 नियम आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. यानुसार, जर तुम्ही 20 मिनिटे सतत स्क्रीनकडे पाहत असाल, तर 20 सेकंदांपर्यंत तुमच्यापासून किमान 20 फूट दूर वर असलेली काही वस्तू एकटक पाहावे. हा आपल्या डोळ्यांसाठी खूप उपयुक्त व्यायाम आहे. 
 
 * पापण्या मिचकावत  राहा -
आपल्या पापण्या नेहमी मिचकावत राहा कॉम्प्युटरवर काम करत असताना, पापण्या मिचकवण्याची सवय लावा. यामुळे डोळ्यांमध्ये पुरेसा ओलावा राहतो आणि डोळे कोरडे होण्याचा धोका कमी होतो. पापण्या मिचकवल्याने डोळ्यांना आराम मिळतो, ज्यामुळे स्नायूंवर पडणारा अतिरिक्त दबाव कमी होतो.
 
* निळा प्रकाश कमी करा
तज्ज्ञांच्या मते, संगणक-मोबाईलचे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी त्यातून निघणारा निळा प्रकाश कमी ठेवा. आजकाल सेटिंग्जमध्ये रिडींग मोडचा एक पर्याय आहे जो आपोआप हा प्रकाश कमी करतो. वाचन मोडमध्ये काम केल्याने डोळ्यांवर दुष्परिणाम होण्याचा धोका कमी होतो. डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

आरसीएफएलमध्ये १० सहायक अधिकारी पदांसाठी भरती, २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

सकाळी चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, दररोज रात्री हे उपाय करा

रात्रभरात तुमच्या आतड्यांमधील सर्व घाण काढण्यासाठी या टिप्स अवलंबवा

दिवसभर सक्रिय राहायचे असेल, तर सकाळी सूर्यनमस्कार करा, त्याचे फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : दयाळूपणाचे फळ; गोष्ट शेतकरी आणि कबुतराची

पुढील लेख
Show comments