शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 21 एप्रिल 2022 (15:36 IST)

उन्हाळ्यात सातूचं सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर, सातूचं पीठ तयार करण्याची कृती

sattu benefits
उन्हाळ्यात सातूचे सेवन केल्याने आपण उष्माघात आणि उष्णतेपासून वाचू शकता. सातूच्या सेवनामुळे उष्माघात होण्याची शक्यता कमी होते आणि शरीरात थंडावा जाणवतो. सातू खाल्ल्याने ऊर्जा मिळते. अशक्तपणा दूर करून आपल्याला उत्साही ठेवण्यास प्रभावी आहे. यामध्ये बरेच पौषक घटक आढळतात जे आपल्याला पोषण देतात.
 
अर्धा किलो गहू
अर्धा किलो चिवड्यात वापरण्यात येणारी डाळवं
अर्धा चमचा सुंठ पूड
पाव चमचा वेलची पावडर
 
कृती
गहू धूऊन १५ मिनिटं भिजवून ठेवा नंतर कपड्यावर काढून निथळा.
जरा ओलसर असतानाच खल-बत्यात हलक्या हातानी कांडून घ्या.
नंतर फोलपटं काढलेले गहू पूर्ण वाळवा.
वाळलेले गहू मंद आचेवर खमंग भाजा.
यात डाळवं घालून दळून आणा.
तयार पिठात सुंठपूड आणि वेलचीची पूड घालून मिसळून घ्या.
पीठ कोरड्या बरणीत भरून ठेवा.
 
खाण्याची विधी
तयार सातूच्या पिठात आवडीनुसार गूळ आणि दूध किंवा पाणी घाला.