Biodata Maker marathi
✕

आलं लसूण निरोगी ठेवते, खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Updated: रविवार, 9 मे 2021 (16:58 IST)
आपण अन्नाची चव वाढविण्यासाठी आले-लसूण वापरतो,परंतु आपल्याला त्याच्या आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांविषयी माहिती आहे का? लसूण-आल्याचे सेवन करून आपण निरोगी शरीर मिळवू शकता. परंतु यासह, हे कसे वापरावे याबद्दल आपल्याला देखील माहित असणे आवश्यक आहे. बहुतेक लोक असा विचार करतात की खाण्यात आलं लसूण खाणं पुरेसे आहे या शिवाय देखील आपल्याला याचे सेवन केले पाहिजे कारण शिजवल्यावर याचे गुणधर्म कमी होतात. चला याचा वापर कसा करावा जाणून घेऊ या.
 
रोगप्रतिकारक शक्ती कशी मजबूत करावी?
रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी लसूण वापरा. ते शिजवण्याऐवजी त्याचे छोटे तुकडे करा. त्यांना थोडा वेळ हवा लागू द्या. लसणात अँटिमायक्रोबियल घटक आढळतात हे घटक व्हायरस, बॅक्टेरिया आणि बुरशी विरुद्ध कार्य करतात. लसूण खाल्ल्याने अँटी व्हायरस संरक्षण मिळते.  
 
लसूण कसे खावे
लसणाचे लहान तुकडे करा. हे आपण जेवल्यावर पाण्यासह घेऊ शकता
लसूण चावण्या ऐवजी पाण्यासह गिळून घ्या अशा प्रकारे लसूण सेवन केल्यास फायदा मिळतो. 
लसूण 25 ते 30 दिवसांपर्यंत नियमितपणे खाल्ल्यानंतर आपल्यातून लसणाचा वास येऊ लागतो, मग आपण समजून घ्या की आपल्याला यापेक्षा अधिक लसूण खाण्याची आवश्यकता नाही.
बऱ्याच लोकांना लसूण पचत नाहीत. यासाठी हे एकत्र खाऊ नका आणि हळू हळू त्याची सवय लावा. सुरुवातीला आपण लसणाच्या लहान भागाचे सेवन केले पाहिजे, नंतर हळूहळू हळूहळू वाढवा. जेव्हा आपण लसूण घेत असाल तर त्याबरोबर दहीही घ्या.
 
आलं -
आल्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. याचा उपयोग करून, आपण आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवू शकता. त्याचे नियमित सेवन केल्याने आपल्याला आरोग्यासाठी बरेच फायदे मिळतील.
 
आलं कसं खावे -
आलं बारीक वाटून घ्या 1चमचा आलं घेऊन त्यामध्ये 6 ग्लास पाणी घाला. हे उकळू द्या पाणी 3 ग्लास झाल्यावर 1 कप पाणी काढून घ्या हे पाणी आपण गूळ किंवा मधासह देखील घेऊ शकता. दिवसातून एकदा हे पाणी प्या.  
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कार्तिकी एकादशीच्या फराळासाठी खास नवीन आणि हटके रेसिपीज येथे पहा Upvas Recipes for Kartiki Ekadashi

Benefits of guava हिवाळ्यात पेरू खाणे रोगप्रतिकारशक्तीपासून ते पचनापर्यंत अत्यंत फायदेशीर

हिवाळ्यात तुमचे ओठ फुटतात का? त्यांना नैसर्गिकरित्या मुलायम ठेवण्यासाठी घरीच बनवा ''पारिजातक फुलांचा लिप बाम''

पौराणिक कथा : विंध्याचल पर्वताच्या गर्वाचा नाश

Saffron Milk हिवाळ्यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट ''केसर दूध'' पिण्याचे प्रमुख फायदे

पुढील लेख
Show comments