मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 9 मे 2021 (09:00 IST)

कोविड -19 संसर्ग आहे तर वाफ घ्या ,वाफ कधी घ्यावी आणि त्याचे फायदे जाणून घ्या

कोरोनाचे संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जेणे करून या आजाराची बाधा होऊ नये. योग,प्राणायाम काढा,कोविडचे नियमांचे पालन करणे सारखे प्रयत्न केले जात आहे. या सह तज्ञ सल्ला देत  आहे की नियमितपणे वाफ घ्या. या मुळे आपली श्वसन प्रणाली चांगली राहील. विषाणू फुफ्फुसांपर्यंत गेला असेल तर संसर्ग कमी करण्यात फायदा मिळेल. 
 
वाफ कशी घ्यावी ?
वाफ तर सर्वच घेत आहे परंतु याची योग्य पद्धती माहिती असावी. वाफ घेताना याचा प्रभाव आपल्या घशात आणि श्वसन प्रणालीच्या शेवटच्या टोका पर्यंत पडला पाहिजे. आपल्याला फायदा होईल. तसेच वाफ घेताना तोंड उघडून वाफ घ्यावी या मुळे तोंडाच्या आतील भागात देखील फायदा होईल. 
 
वाफ कधी घ्यावी ? 
तज्ञांच्या सल्ल्यानुसार वाफ किमान दिवसातून 3 -4 वेळा घ्यावी. वाफ घेण्याची कालावधी 3 -4 मिनिटे ठेवा. या मुळे विषाणूंचा प्रभाव कमी होईल जर आपल्याला वाफ घेण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होत आहे. तर वाफ घेऊ नये. एखादा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वाफ घ्या.