शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

जाणून घ्या : कोणत्या फळांना केव्हा खाणे उत्तम?

आमच्या पैकी सर्वच जण नेमाने फळांचे सेवन करतात, पण यानंतर देखील ते आजारी पडतात. याचे मागचे कारण असे ही होऊ शकत की आम्ही चुकीच्या वेळेस वस्तूंचे सेवन करतो यामुळे फायदा तर मिळतच नाही पण नुकसानच होत. 
 
सफरचंद : 
अॅप्पलचे सेवन सकाळी नाश्ता करताना करणे उत्तम मानले जाते. यात पेक्टिन नावाचा तत्त्व उपस्थित असतो जो बीपी लो करतो आणि कोलेस्ट्रालला कमी करतो. रात्रीच्या वेळेस जेवणात अॅप्पल नाही खायला पाहिजे कारण रात्री पेक्टिनच्या पचनामध्ये अडचण येते आणि यामुळे पोटात अॅसिडिटी वाढते.  



केळी :
केळींचे सेवन दुपारी अर्थात लंचमध्ये करायला पाहिजे. केळी आमच्या शरीरात प्रतिरोधक क्षमता वाढवण्यात मदतगार ठरतात. केळींचे सेवन रात्री बिलकुल नाही करायला पाहिजे कारण यामुळे अपचची समस्या वाढते.
 
बटाटा :
बटाटा आणि त्याने तयार पदार्थांचे सेवन सकाळी नाश्ता करण्यासाठी योग्य मानले गेले आहे. हे देखील कोलेस्टरॉल कमी करतो आणि आमच्या शरीराला योग्य ऊर्जा देतो. यात हायकॅलोरी असल्यामुळे रात्री याचे सेवन करणे टाळावे. जर तुम्ही रात्री बटाटा खात असाल तर याने वजन वाढण्याची समस्या येऊ शकते.  


दूध :
दुधाबद्दल तर डॉक्टर देखील सांगतात की याचे सेवन रात्री करणे योग्य असत. रात्री कोमट दुधाचे सेवन केल्याने चांगली झोप येते आणि शरीरात एनर्जी रिस्टोर होते. सकाळी जर जास्त मेहनत किंवा व्यायाम करत असाल तरच दूध घ्या अन्यथा हे पचण्यास जड असत.     
 
सुखे मेवे व शेंगदाणे  :
यांचे सेवन दुपारी करणे उत्तम मानले जाते कारण हे ब्लड प्रेशरला कमी करण्यास मदत करतात. रात्री यांचे सेवन केल्याने लठ्ठपणाची समस्या होण्याची शक्यता राहते.  
 
संत्री :
संत्र्याचे सेवन संध्याकाळी किमान चारच्या दरम्यान केले पाहिजे. असे म्हटले जाते की सकाळी उपाशी पोटी नाश्तात संत्र्यांचे सेवन केल्याने पोटाशी निगडित समस्या होऊ शकते. 

टोमॅटो :
टोमॅटोचे सेवन सकाळी उत्तम मानले जाते कारण रात्री याचे सेवन केल्याने पोटफुगीचा त्रास होऊ शकतो.