Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भेसळयुक्त गव्हाच्या पीठाची ओळख या पद्धतीने करा

Updated: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (17:23 IST)
 
गव्हाच्या पिठात अनेक प्रकारे भेसळ करतात. जसं की बऱ्याच वेळा पिठात खडू पावडर, मैदा, किंवा बोरिक पावडर देखील मिसळतात. अशा परिस्थितीत या पिठाचे सेवन कधीही करू नये. पिठात भेसळ आहे किंवा नाही हे शोधण्याच्या कामात पाणी देखील मदत करेल.  
आपल्याला काय करावयाचे आहे की एका ग्लासात पाणी घ्या या मध्ये अर्धा चमचा गव्हाचं पीठ घाला. जर आपल्याला पाण्याच्या वर काही तरंगत दिसत असेल तर समजावं की हे पीठ भेसळीचे आहे.  
 
पिठात केलेली भेसळ ओळखण्यासाठी आपण हायड्रोक्लोरिक ऍसिडचा वापर देखील करू शकता. जर आपण हा विचार करीत आहात की या साठी पिठाला लॅब मध्ये न्यावं लागेल, तर असं काहीच नाही आपण हायड्रोक्लोरिक चा वापर घरात देखील करू शकता. जेणे करून आपण पिठातली भेसळ ओळखू शकाल आणि आपल्याला आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्प्रभावा पासून वाचता येईल या साठी आपल्याला गरज आहे एक टेस्ट ट्यूब आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड ची.       
 
टेस्ट ट्यूब आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड सहजपणे बाजारपेठेत औषधांच्या दुकानात मिळेल. पिठात भेसळ आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका टेस्ट ट्यूब मध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालायचे आहे. नंतर या मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड घालावयाचे आहे. काही वेळा नंतर काही गाळ दिसेल तर समजावं की हे पीठ भेसळयुक्त आहे. या मध्ये खडूच्या पावडरची भेसळ केलेली आहे.
 
* लिंबाच्या साहाय्याने  देखील  वास्तविक आणि भेसळयुक्त पीठ ओळखले जाऊ शकतो. या साठी आपल्याला गव्हाचं पीठ आणि एक लिंबू पाहिजे, ज्याच्या साहाय्याने आपण ही चाचणी  करावयाची आहे. या साठी सर्वप्रथम एका चमचा पीठ घ्या आणि त्याच्या वर लिंबाच्या रसाचे काही थेंबा घाला. लिंबाचा रस घातल्यावर जर बुडबुडे येत असतील, तर समजावं की पीठ भेसळयुक्त आहे. पिठा मध्ये बुडबुडे तेव्हाच येतात जेव्हा या मध्ये खडू पावडर ची भेसळ केलेली आहे.
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

सणासुदीला बनवा खमंग पुरणपोळी! जाणून घ्या साहित्य आणि सोपी कृती

Jivati Puja Naivedya जिवती पूजनाच्या नैवेद्यात काय असावे?, मुख्य पदार्थ नक्की जाणून घ्या

Deep Amavasya Wishes Images: दीप अमावस्येनिमित्त पाठवा हे सुंदर मेसेज आणि डिजिटल शुभेच्छा!

Independence Day Recipes 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष खास तिरंगा रेसिपीस

सकाळी भिजवलेले अंजीर खा आणि मिळवा ‘हे’ आरोग्यदायी फायदे; योग्य पद्धत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments