मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (19:47 IST)

पचन आणि प्रतिकारक शक्ती वाढवते हे खास फळ जाणून घ्या माहिती

आपण या रामबुतान फळ बद्दल ऐकले आहे का? जर आपण या फळाबद्दल जाणत असाल तर चांगले आहे आणि जर का ऐकले नाही तर आम्ही सांगू इच्छितो की हे फळ व्हिटॅमिन आणि खनिज पदार्थांचे चांगले स्रोत आहे. या फळाच्या बियाणा पासून झाडाची साल आणि पान देखील शरीरासाठी फायदेशीर आहे.या फळांच्या साला मध्ये अँटी कर्कविरोधी गुणधर्म आढळतात. तर ह्याचे बियाणे मधुमेहासाठी फायदेशीर आहे.ह्याच्या पानांचा रस डोक्याच्या त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतो आणि झाडाची साल जखमेचा उपचार करण्यासाठी वापरतात.चला तर मग या पासून मिळणारे फायदे जाणून घेऊ या.
 
* पचन सुधारतो रामबुतान फळ -
या फळात मुबलक प्रमाणात फायबर आढळतं,जे पचन प्रणाली साठी फायदेशीर आहे. ह्याचा सेवन केल्यानं बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत मिळते.या शिवाय हे फळ अँटी बेक्टेरियल गुणधर्माने समृद्ध आहे, जे आतड्यासाठी फायदेशीर आहे.
 
* हाडांना बळकट करतो - 
या फळामध्ये कॅल्शियम,झिंक,पोटॅशियम,फॉस्फोरस,मॅगनीज,लोह आणि मॅग्नेशियम सारखे खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. हे सर्व खनिज हाडांच्या सामर्थ्यासाठी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत या फळाचे सेवन केल्यानं हाडांना बळकट करण्यात मदत करतो.
 
* रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो -
हे फळ रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यात देखील प्रभावी आहे. खरं तर या मध्ये तांबा असतो, जे शरीरा द्वारे आयरन चा वापर करून हिमोग्लोबिन तयार करतो, जेणे करून रोग प्रतिकारक शक्ती बळकट आणि निरोगी बनवता येते.
 
* मधुमेहा मध्ये देखील फायदेशीर आहे-
एका अभ्यासानुसार, या फळाच्या साला मध्ये मधुमेहा शी लढा देण्याचे गुणधर्म असतात. ह्याच्या सालीचा रस मधुमेहासाठी रक्तातील ग्लूकोज ची पातळी कमी करण्यात प्रभावी आहे.