गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (09:45 IST)

वजन कमी करण्यासाठी ​पौष्टिक आहारासाठी व्यायाम आवश्यक

वजन कमी करण्यासाठी व्यायामासह पौष्टिक आहाराची गरज असते. आपण वर्कआऊट न करता देखील वजनावर नियंत्रण आणू शकता परंतू व्यायामाने अधिक लाभ मिळतात. व्यायाम केल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत होते ज्याने फॅट्स आपोआप गळू लागतात. शरीराला योग्य आकार मिळण्यास देखील मदत होते. रक्त संचार सुरळीत राहतं आणि शरीराला ऊर्जा मिळते.
 
नुसतं डायट कंट्रोल करुन वजन कमी करता येते परंतू व्यायामामुळे शरीर निरोगी आणि लवचिक राहण्यास मदत होते. आपण जिम मध्ये जाऊन एक्सरसाइज करु शकत नसाल तर वॉकिंग, रनिंग, सायकलिंग तसेच घरात काही हलके फुलके व्यायाम देखील पुरेसे होतील. व्यायामामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात, मन प्रसन्न राहतं. दररोज ३० ते ४० मिनिटे नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे.
 
आपण शारीरिक श्रम घेऊ शकत नसाल तर योगा उत्तम पर्याय ठरेल. याने शरीर निरोगी राहील आणि ताण देखील कमी होईल.