सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 30 डिसेंबर 2020 (15:11 IST)

पपईचे लठ्ठपणा कमी करण्याव्यतिरिक्त इतर फायदे

पपई ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ह्याचे सेवन केल्याने पचन तंत्र बळकट करते आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील सहाय्यक आहे. दररोज पपई खाल्ल्याने बऱ्याच आजारांना टाळता येऊ शकत. पपईचे ज्यूस देखील घेऊ शकता. पपईची चटणी देखील बनविली जाते. बरेच लोक कच्च्या पपईची भाजी देखील चवीने खातात.प्राचीन काळापासून घरघुती उपचार म्हणून देखील पपईचा वापर करतात. केवळ भारतातच नव्हे तर हे मलेशिया आणि थायलंड मध्ये देखील पपईचा वापर केला जात आहे. चला तर मग जाणून घ्या ह्याच्या सेवनाच्या फायद्यां विषयी. 
 
जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दररोज पपईचे सेवन करावे, या मुळे पोट साफ होत .या शिवाय हे डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. ह्याचा सेवन केल्याने शरीरात पाण्याची कमतरता टाळू शकतो. एका अहवालानुसार 100 ग्रॅम पपई मध्ये 43 ग्रॅम कॅलरी असते. पपई मध्ये फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात आढळतात, या मुळे हृदयाशी निगडित आजाराचा धोका कमी होतो. म्हणून दररोज पपईचे सेवन केले पाहिजे.
 
पपईचे सेवन संधिवातासाठी फायदेशीर आहे. या मध्ये अँटी इंफ्लेमेट्री एंझाइम आढळतात. जे संधिवातामुळे होणाऱ्या वेदनेला दूर करण्यात मदत करतात. एका अभ्यासानुसार, जे लोक नियमितपणे पपई सारख्या खाद्य पदार्थांचे सेवन करतं नाही, त्यांना संधिवात होण्याची दाट शक्यता असते.उच्च रक्तदाब ग्रस्त असलेल्या लोकांना आपल्या आहारात पपई समाविष्ट करायला पाहिजे. खरं तर पपई पोटॅशियमचे चांगले स्रोत आहे, जे सोडियम च्या परिणामाचे प्रतिकार करतो आणि रक्तदाबाची पातळी सामान्य राखण्यास मदत करतो.