बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (10:06 IST)

पपई खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

पपई ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे सेवन पचन संस्थेला बळकटच करत नाही तर लठ्ठपणा कमी करण्यास देखील उपयुक्त ठरते. दररोज पपई खाल्ल्याने अनेक प्रकाराचे आजार टळू शकतात. आपण पपईचा रस देखील घेऊ शकता. पपईची चटणी देखील बनवतात. तर बरेच लोक कच्च्या पपईची भाजी देखील बनवतात. आणि चव घेऊन खातात. प्राचीन काळापासून पपई देखील एक घरगुती उपाय म्हणून वापरतात. पपई केवळ भारतातच नव्हे तर मलेशिया आणि थायलंड मध्ये देखील वापरतात. चला तर मग जाणून घेऊ या, ह्याचा सेवनाच्या फायद्यांबद्दल.
 
* जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होतं असल्यास दररोज पपई खावी, या मुळे आपले पोट स्वच्छ होते. या शिवाय हे डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. याचा सेवनाने शरीरात पाण्याची कमतरता पासून होणाऱ्या त्रासाला देखील टाळू शकतो. एका अहवालानुसार सुमारे 100 ग्रॅम पपई मध्ये 43 ग्रॅम कॅलरी असते.
 
* पपई मध्ये फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात आढळतात, या मुळे हृदय संबंधी आजाराचा धोका कमी होतो. म्हणून आपल्याला दररोज पपईचे सेवन केले पाहिजे.
 
* पपईचे सेवन संधिवातात देखील फायदेशीर आहे. वास्तविक या मध्ये अँटी इंफ्लेमेटरी एंझाइम असतात. जे संधिवातामुळे होणारी वेदना कमी करण्यात मदत करतात. एका अभ्यासानुसार, जे लोक नियमितपणे पपई सारख्या खाद्य पदार्थाचे सेवन करत नाही, त्यांना संधिवात होण्याची शक्यता जास्त असते.
 
* उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या लोकांनी आपल्या आहारात दररोज पपईला समाविष्ट करावे. वास्तविक पपई पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे, जो सोडियम च्या होणाऱ्या परिणामाचा प्रतिकार करतो आणि रक्तदाबाच्या पातळीस सामान्य राखण्यास मदत करतो.