दिवाळीमध्ये दम्याच्या रुग्णांनी या 5 गोष्टींची काळजी घ्यावी

Last Modified शनिवार, 7 नोव्हेंबर 2020 (16:52 IST)
दिवाळीच्या सणाची अगदी सगळेजण उत्सुकतेने आणि आतुरतेने वाट बघतात. त्यासाठीची जय्यत तयारी देखील सुरू होते. सर्वांचा उत्साह या सणासाठी द्विगुणित होतो. आपल्या घराला सजविण्यासाठी लोक आपल्या घराची स्वच्छता करतात. जाळे-जळमट काढतात. सगळी कडे धुळीचे वातावरण असतं. पण अशात दम्याच्या रुग्णांना आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं.

स्वच्छतेमुळे आणि फटाक्यांमुळे त्यांना आरोग्याशी निगडित त्रासांना सामोरी जावं लागू शकतं. म्हणूनच या साठीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. चला जाणून घेऊ या काही महत्त्वाच्या टिप्स.

1 घराच्या साफ स्वच्छतेपासून दूरच राहावं, शक्य असल्यास स्वच्छतेसाठी एखाद्या कामगाराची मदत घ्या. साफ स्वच्छता करताना धूळ कणांच्या संपर्कात येऊ शकता. जे आपल्यासाठी हानिकारक आहे.
2 जरी आपल्याला फुलबाज्या, अनार याची आवड असल्यास, आपल्या आरोग्याची काळजी घेत यापासून अंतर ठेवणं आवश्यक आहे. या पासून निघणारा धूर आपल्यासाठी त्रासदायी होऊ शकतो.

3 जास्त वेळ घरातच घालवणे योग्य आहे, कारण घराच्या बाहेर फटाक्यांचा धूर संपूर्ण वातावरणात पसरतो. घराच्या बाहेर राहण्याने आपल्याला त्या धुराचा त्रास होऊ शकतो आणि आपल्या आरोग्यास धोका संभवतो.

4 आपले इन्हेलर आणि औषधे नेहमी आपल्या जवळ बाळगा. आपल्याला कोणत्याही क्षणी याची गरज भासू शकते. अशा परिस्थिती, आवश्यक वेळी ते आपल्या बरोबर असायला हवं.
5 आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्या. जास्त तेल आणि मसालेयुक्त अन्न घेणे टाळा. जास्तीत जास्त पाणी प्या. जेणे करून आपले शरीर हायड्रेट राहील.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

शाकंभरी देवी पूजा विधी

शाकंभरी देवी पूजा विधी
शाकंभरी देवीला दुर्गादेवीचे सौम्य रुप मानले गेले आहे. देवीचे हे रुप अत्यंत दयाळु, कृपाळु ...

गुरु गोविंद सिंग जयंती विशेष

गुरु गोविंद सिंग जयंती विशेष
श्री गुरु गोविंद सिंह हे शीख धर्माचे दहावे गुरू होय. त्यांचा जन्म 1666 मध्ये पाटना येथे ...

बुध अष्टमी व्रत कथा आणि महत्व

बुध अष्टमी व्रत कथा आणि महत्व
अनेक ठिकाणी बुध अष्टमीच्या महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी श्री विष्णू ...

चाणक्य नीती : अशा स्त्रियांपासून नेहमी लांब राहावे

चाणक्य नीती : अशा स्त्रियांपासून नेहमी लांब राहावे
आचार्य चाणक्याने नीतिशास्त्रात जीवनाच्या विविध पैलू बद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ...

ज्या स्त्रीमध्ये असतात हे 3 गुण त्यांच्या घरात धन येतं

ज्या स्त्रीमध्ये असतात हे 3 गुण त्यांच्या घरात धन येतं
स्त्री असो किंवा पुरुष जर त्यांचे मन स्वच्छ आहे शुद्ध आहे त्यांच्या मध्ये जिद्द आहे ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...