रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (09:38 IST)

दम्याच्या त्रासापासून आराम मिळण्यासाठी दररोज कपालभाती व्यायाम करा

दररोजच्या व्यस्त दिनचर्येमुळे बरेच लोक चुकीच्या सवयींना बळी पडतात. ज्यामुळे त्यांना अनेक आजार वेढतात. जर आपल्याकडे व्यायामासाठी किंवा योग करण्यासाठी पुरेसा वेळ नाही तर केवळ या कपालभातीच्या प्राणायामाच्या साहाय्याने देखील निरोगी राहता येऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊ या प्राणायामाबद्दल.
 
कसे करावे हे आसन- 
कपालभाती प्राणायाम करण्यासाठी सिद्धासन, पद्मासन किंवा वज्रासनात बसावे आणि आपल्या तळहाताला घुडग्यावर ठेवा. शरीराला ताठ ठेवा. 
 
आपली पूर्ण क्षमता लावून सामान्यांपेक्षा थोडा दीर्घ श्वास घेत आपली छाती फुगवा. नंतर झटक्याने श्वास सोडत पोटाला आत ओढा. जसेच आपण आपल्या पोटाच्या स्नायूंना सैल सोडता, श्वास आपोआपच फुफ्फुसात पोहोचते. कपालभाती करताना लक्षात ठेवावं की आपण घेतलेलं वारं एकाच झटक्यात बाहेर पडावं.
 
कपालभाती प्राणायाम करण्याचे फायदे -
कपालभाती प्राणायाम हे मानसिक विकारांना दूर करून त्यांना शांत करण्यास मदत करते जसे की श्वास सोडताना असे वाटते की सर्व नकारात्मक गोष्टी मनातून बाहेर पडत आहेत. 
कपालभाती प्राणायाम शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. हे प्राणायाम केल्याने खेळाडूंच्या आत क्रीडाकौशल्य वाढतं. 
हे प्राणायाम केल्याने दम्याच्या रुग्णांना देखील आराम मिळतो. 
हे डोळ्याच्या खालील होणारे गडद मंडळे देखील बरे करते. 
कपालभाती प्राणायाम केल्याने मेटॅबॉलिझम वाढतं आणि वजन कमी होऊ लागतं.
 
आणखीन बरेच आहे फायदे -
* कपालभाती प्राणायाम केल्याने डोळ्याच्या खालील काळे मंडळे बरे होतात.
 
* दात आणि केसांशी निगडित सर्व रोग देखील हे प्राणायाम केल्याने दूर होतात.
 
* बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटी, सारख्या पोटाच्या तक्रारी देखील या प्राणायामाने दूर होतात.
 
* या प्राणायामाने श्वसन मार्गाची स्वच्छता होते, ज्यामुळे श्वसन संबंधित रोग दूर होतात.
 
* हा प्राणायाम सायनसला शुद्ध करतो आणि मेंदूला सक्रिय करण्यास मदत करतो.
 
प्राणायाम करण्यासाठी घ्यावयाची खबरदारी-
कपालभाती करताना आपल्याला काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या प्राणायामाचा संबंध शरीराशी नसून मेंदूशी असतो. जर आपण चुकीच्या पद्धतीने प्राणायाम केल्यास आपणास न्यूरॉलॉजिकल समस्या आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात.