रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (08:37 IST)

आतून व्हा सक्षम

बाहेरचे वातावरण बदलत आहे. हळूहळू थंडी वाढत जाणार आहे. वातावरणातली आर्द्रता, थंडी आणि आयुष्यातले ताणतणाव या सगळ्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. सध्याच्या धावपळीच्या काळात आजारी पडून चालण्यासारखे नसते. बाहेरचे वातावरण कसेही असले तरी आपण थांबून चालत नाही. आजारांना लांब ठेवायचेअसेल तर आतून सक्षम असणे गरजेचे असते. यासाठी नेमके काय करायला हवे, याविषयी...
 
* सोडा, कोल्डड्रिंक, फळांचा रस अशा थंड पेयांना बाजूला सारून गरम पेये प्या. गरम म्हणजे अगदी उकळते पाणी नाही. जेवणाआधी आणि नंतर ग्लासभर गरम पाणी प्या. यामुळे शरीरातली उष्णता टिकून राहील. शिवाय पचनालाही मदत होईल. हर्बल टी, ग्रीन टी हे ऑप्शन्स ट्राय करता येतील. न्याहारीला चहा, कॉफी ऐवजी ग्रीन टी, हर्बल टी प्या.
* या दिवसात गाजर, बीट, भोपळा, बटाटे, रताळी असे पदार्थ खा. हंगामी फळे आणि भाज्या खाल्ल्याने आवश्यक ती पोषक द्रव्ये शरीराला मिळतात. खजूर, द्राक्षे, पेअर, संत्री अशी फळे खा. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढायला मदत होईल.
* थंडीत लवकर झोपा. उगाचच जागरण करण्यात काहीही अर्थ नाही. लवकर झोपून लवकर उठण्याचा प्रयत्न करा. मोबाइल, लॅपटॉपला बाजूला सारा. त्याऐवजी झोपण्याआधी गाणी ऐका, वाचन करा. श्वसनाचे व्यायाम करा. वेगवेगळ्या वासाच्या तेलाचा सुगंध घ्या. यामुळे शांत झोप येईल.
* यीन योगा हा व्यायामप्रकार करता येईल. यीन योगा मेडिटेशनचा एक प्रकार आहे. यामुळे ताणतणाव कमी व्हायला मदत होते. यीन योगाचीआसने ऑनलाइन शिकता येतील.