रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (09:04 IST)

'यांना' कोरोना लस देऊ नका, आरोग्य मंत्र्यांनी केला खुलासा

कोरोना लस सर्वांसाठी सुरक्षित असली तरीही 18 वर्षाखालील मुलांना, गरोदर महिलांना आणि अँलर्जी असणाऱ्यांना ही लस देऊ नये, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोविड योद्धांना लस देण्यावर भर देणार असंही त्यांनी म्हटले. 
 
कोविड 19 आजारावरची उपयुक्त अशी सीरम इन्स्टिट्यूटच्या 'कोविशील्ड' लस ही मुंबई, नाशिक आणि औरंगाबादमध्ये दाखल झाली आहे. मुंबईत बीएमसीच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून आणण्यात आली. मनपाच्या परळ येथील F- दक्षिण विभाग कार्यालयात लसीचा हा साठा पोहोचला आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस बीएमसीला मिळालेत. त्यामुळे मुंबईत 16 जानेवारीला लसीकरण शक्य आहे. 
 
तर नाशिकमध्ये देखील कोविड लस दाखल झाली आहे. नाशिक विभागाला 1 लाख 32 हजार कोविडच्या लसीचे डोस मिळालेत. 
 
केंद्र शासनाकडून राज्यात कोरोना लसींची पुरवठा, त्यांच्या निर्देशनुसार जिल्ह्यांना वाटप सुरू. राज्यात ३५८ केंद्रांद्वारे लस देणार आहेत. सर्वाधिक केंद्र मुंबईत (५०), त्यापाठोपाठ पुणे (३९), ठाणे (२९). मुंबईसाठी १,३९,५०० तर पुण्यासाठी १,१३,००० डोसचे वितरण केल जात आहे.