बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (07:16 IST)

मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख पार

मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव भाव कमी होत आहे. त्यामुळे मुंबईतील काही हॉटस्पॉट ठिकाणे कोरोनामुक्त झाली आहे. बुधवारी मुंबईत ६७५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख पार गेला आहे.
 
मुंबईत बुधवारी ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून ५३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ४७१वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार २१० जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ८० हजार ८५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
राज्यात बुधवारी ३ हजार ५५६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १९ लाख ७८ हजार ४४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ५० हजार २२१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे. तसेच सध्या ५२ हजार ३६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.