गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (15:38 IST)

अंक ज्योतिष : मूलांक 8 भविष्यफळ 2021

मूलांक 8 आणि अंक शास्त्र भविष्य वर्ष 2021
मूलांक 8
आपला जन्म 8, 17 किंवा 26 तारखेला झाला असेल तर आपला मूलांक 8 आहे आणि स्वामी न्यायाचे घटक शनी ग्रह आहे. अशा लोकांचे आयुष्य संघर्षमय जातात हे खूप महत्त्वाकांक्षी असतात. यश आणि धन मिळविण्यासाठी दिवस रात्र एक करतात, त्यामुळे हे आपल्या कुटुंबाला कमी वेळ देतात. 8 मूलांकाचे लोकं खूप चांगले व्यवसायी असतात, या साठी त्यांचे डोकं खूप चालतं. हे लोकं आपल्या प्रयत्नांनी आयुष्यात उंच शिखरावर पोहोचतात. ह्यांचे स्वप्न उंच असतात त्यामुळे ह्यांना पैसे कमाविणे आणि खर्च करणं चांगलं येतं. या मूलांकाच्या लोकांसाठी हे वर्ष खूप चांगलं जाणार आहे, ज्यामुळे हे लोकं आपल्या परिश्रमांनी यश संपादन करतील. हे वर्ष आर्थिक दृष्टीने खूप फायदेशीर जाणार आहे.

करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
या मूलांक 8 च्या लोकांचे हे वर्ष कामासाठी नवीन संधी मध्ये यश घेऊन येणारे आहे. या वर्षी आपले मागील वर्षाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण होतील आणि आपली एक नवीन ओळख निर्माण करतील. हे वर्ष नवीन व्यवसायाच्या नवीन संधी यशासह फायद्याचे दार उघडत आहे. जर आपण बाहेरच्या कंपन्यांशी संपर्क बनवू इच्छित असाल तर हे वर्ष आपली मदत करेल. आपला सौदा यशस्वी ठरेल. नोकरदार वर्गांना, या वर्षी अधिक परिश्रम करावे लागतील कारण आपण कामांसह फिरण्याची योजना आखाल जेणे करून कामात लक्ष कमी दिल्या मुळे अधिकाऱ्यांच्या नजरेस याल, म्हणून कामात जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करा. नवीन नोकरीचा शोध याच वर्षी पूर्ण होईल.
 
आर्थिक दृष्ट्या कसे असणार हे वर्ष 2021 :
मूलांक 8 साठी हे वर्ष आर्थिक दृष्ट्या आपले सर्व स्वप्न पूर्ण करणारा असेल. पण आपल्याला पैसे खर्च करण्यासह बचतीकडे देखील लक्ष द्यावे लागेल, अन्यथा वर्षाच्या अखेरीस पाकीट रिकामे होईल. शेअर बाजारात गुंतवणूक करावयाची असल्यास एप्रिल पर्यंतचा काळ चांगला असेल आणि ऑगस्टच्या नंतरचा काळ फायदेशीर ठरेल. वर्षाच्या मध्यकाळात जमिनीच्या व्यवहारासह कर्ज देणे घेणे टाळावे. वर्षाच्या अखेरीस काळ नवीन कामात गुंतवणूक करण्यासाठी चांगला राहील, परंतु कोणत्याही महिला मित्रासह काम करणे टाळा आणि पैसे देण्याचे वचन देखील देऊ नका.
 
प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनासाठी कसे असणार हे वर्ष 2021 :
या मूलांकासाठी हे वर्ष संबंधात खूप काळजी घेणारे आहे. कारण आपण कामात आणि पैसे कमाविण्यात इतके व्यस्त असाल की आपल्या प्रियकराला आणि कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकणार नाही. आपण ज्याच्यावर प्रेम करता त्याच्या भावना समजून घ्या.त्याचा सह कोणती ही फसवे गिरी करू नका. जर आपले संबंध एखाद्याशी विभक्त झाले असतील तर आपल्या आयुष्यात या वर्षी एक नवीन जोडीदार येईल. विवाहित लोकांसाठी हे वर्ष काहीसे आंबट-गोड असेल ज्यामुळे आपल्याला नात्याचे महत्त्व समजून घ्यावे लागतील तरच आपण आनंदी आयुष्य जगू शकाल. वर्षाच्या शेवटी आपण आपल्या जोडीदारासह बाहेर फिरायला जाल ज्या मुळे जुने रुसवे-फुगवे दूर होतील.
 
आरोग्यासाठी कसे असणार हे वर्ष 2021 :
या मूलांक साठी हे वर्ष मानसिक तणावातून सुरू होईल. कारण आपण आपल्या कामात अधिक व्यस्त असल्यामुळे आरोग्याकडे लक्ष देऊ शकणार नाही. मित्रांसमवेत बाहेर जाण्याची योजना आखली आहे तर आपल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या पोटातील संसर्गापासून स्वतःला वाचवा. जून च्या नंतर एकाएकी डोक्यात आणि डोळ्यात दुखण्यामुळे कामात मन लागणार नाही. असं असल्यास वेळेत औषधोपचार करावे. वर्षाच्या अखेर कोणत्याही प्रकारच्या अपघातापासून सावध राहा आणि वाहन देखील काळजीपूर्वक चालवा.