गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (11:37 IST)

अंक ज्योतिष : मूलांक 7 भविष्यफळ 2021

मूलांक 7 आणि अंक शास्त्र भविष्य वर्ष 2021 
मूलांक 7
ज्या लोकांचा जन्म 7, 16, 25 तारखेला झालेला आहे त्यांचा मूलांक 7 आहे. ज्याचा स्वामी केतू ग्रह आहे. 7 मूलांकाचे लोकं तत्त्वज्ञांनी आणि विचारवंत स्वभावाचे असतात. असे लोक कोणत्या न कोणत्या संशोधनात लागलेले असतात. हे संपूर्ण आयुष्य आध्यात्मिकतेचा शोधातच असतात. यांच्या मध्ये पूर्वाभास म्हणजे भविष्याला जाणून घेण्याची अद्भुत क्षमता असते. तसेच यांच्या कडे दैवीय शक्ती देखील असते. असे लोकं एकदा अभ्यासात गुंग झाले तर ते खूप खोल शोधात निघून जातात. एकदा ते शोधात निघाले तर ते कुटुंबीयांबद्दल देखील विचार करीत नाही आणि त्या संशोधनात खोल पर्यंत शिरतात. मूलांक 7 साठी 2021 चे वर्ष ज्याचा मूलांक 5 आहे आणि स्वामी बुध ग्रह आहे, तो कुटुंब आणि कामाशी जुळवून घेण्यात मदत करेल. 7 मूलांक असणारे लोकं या वर्षी आपल्या कामात यशस्वी होण्याच्या दिशेने पाउले ठेवून नवीन संधी सह पुढे वाढतील. 
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
मूलांक 7 साठी वर्ष 2021 कामाच्या नवीन संधी आणेल. ज्यामुळे या वर्षी देखील हे लोक आपल्या कामाला मन लावून करतील.हे लोकं या वर्षात आपल्या कामात मेहनतीमुळे यश मिळवतील. आपल्याला मार्चच्या महिन्यापासून नवीन सौदे आणि प्रकल्प मिळतील. ज्या मध्ये आपण आपल्या काम करण्यात यशाच्या सह नाव देखील मिळवाल, ज्यामुळे परदेशात देखील आपले संपर्क होतील. नोकरी करणाऱ्यांना या वर्षी बढतीचे योग दिसून येत  आहे. आपली मेहनत अधिकाऱ्यांच्या समोर आणण्यात सक्षम व्हाल. ज्यांचा कडे नोकरी नाही त्यांना इच्छित ठिकाणी नोकरी मिळेल. जे लोकं नोकरीत बदल करण्याचा विचार करीत आहे, त्यांना एप्रिलच्या पूर्वीच नोकरीची चांगली संधी मिळेल. वर्षाच्या अखेरीस बदलीचे योग देखील बनत आहे जे आपल्यासाठी अधिक चांगले राहील.
 
आर्थिक दृष्ट्या कसे असणार हे वर्ष 2021 :
मूलांक 7 च्या लोकांसाठी हे वर्ष आर्थिक दृष्ट्या चांगले असेल. या वर्षी आपण पैशाची गुंतवणूक करण्यात यशस्वी व्हाल. आपण शेअर बाजारात आवड ठेवत असाल तर हे वर्ष चांगला फायदा देऊन जाणार आहे. पण आपण मे आणि ऑगस्ट च्या मध्य काळात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. मे च्या पूर्वीचा काळ आपल्याला कर्ज घेण्यासाठी फायदेशीर आहे. जर आपल्याला एखाद्या कडून पैसे घ्यावयाचे असतील तर त्याच्या कडून या वर्षी आपण अत्यंत हुशारीने पैसे काढण्यात तज्ज्ञ होऊ शकता. ऑगस्ट नंतर आपले पैसे कोणाकडे तरी अडकू शकतात, पैशांचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. वर्षाच्या अखेरीस जमिनीत पैसे गुंतवू शकता आणि स्वतःचे घर घेण्याची देखील शक्यता आहे.
 
प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनासाठी कसे असणार हे वर्ष 2021
हे वर्ष मूलांक 7 च्या लोकांसाठी संबंधाच्या बाबतीत गोडवा घेऊन येणारा आहे. कारण आपल्या सवयी प्रमाणे कामाच्या समोर कुटुंबीयांना कमी वेळ देता. पण या वर्षी आपण आपल्या कामांसह कुटुंबीयांच्या महत्त्वाला समजाल. त्यांच्यासह बाहेर फिरायला जाऊन वेळ घालवाल. आपण ज्याला प्रेम करता त्यांच्यावर आपले प्रेम व्यक्त कराल. जर आपण एकटे आहात तर या वर्षी एकटे राहणार नाही आपल्या आयुष्यात इच्छित जोडीदार येईल. विवाहित लोकांसाठी वर्ष 2021 जुने रुसवे-फुगवे दूर करण्यासाठी येत आहे. आपण आपल्या जोडीदाराशी भावनिक नाते ठेवण्या व्यतिरिक्त सहानुभूती ठेवाल, ज्यामुळे आपलं नातं आणि प्रेम बहरेल.
 
आरोग्यासाठी कसे असणार हे वर्ष 2021
आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष मूलांक 7 च्या लोकांसाठी चांगले जाणार आहे. आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्याल. स्वतःची काळजी घ्याल. आहारात, तसेच योग आणि ध्यान करण्यासाठी वेळ द्याल. जर आपल्याला पूर्वीपासूनच त्वचेची किंवा रक्तवाहिन्यांची समस्या असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या, जेणे करून वर्षाच्या मध्य काळात आपण केलेल्या दुर्लक्ष मुळे होणाऱ्या नुकसानाला टाळू शकता. जर आपण सप्टेंबर नंतर बाहेर जाण्याची योजना आखत असाल तर वाहन काळजीपूर्वक चालवा आणि आपल्या गळ्याची काळजी घ्या.