बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 13 जानेवारी 2021 (23:00 IST)

नंदुरबार पालिका दारिद्रया रेषेखालील कुटुंबांना मोफत कोरोना लस देणार

नंदुरबार शहरातील दारिद्रया रेषेखालील कुटुंबांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय नंदुरबार पालिकेने घेतला आहे. विशेष म्हणजे नंदुरबार पालिकेने अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद देखील यासाठी केली आहे. शहरात राहणाऱ्या दारिद्य रेषेखालील नागरिकांची संख्या ३० हजार इतकी असून या नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोरोना लसीकरणाचा खर्च नंदुरबार पालिका उचलणार आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नंदुरबार महापालिका ही असं करणारी राज्यात पहिली पालिका असल्याचा दावा शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.
 
या आधी राज्यातील दारिद्य्र रेषेखालील नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. केंद्र सरकारकडे यासाठी आग्रह करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.