गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (20:48 IST)

थर्मामीटर वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

बहुतांश घरात थर्मामीटर असतेच. त्याचा वापर करताना त्याची निगा राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. सफाई न केल्यास थर्मामीटर हे आपल्या आजाराचे कारण ठरू शकते.
 
चांगली स्वच्छताः अनेकांच्या घरात डिजिटल थर्मामीटर आहे. कुटुंबातील एखादी व्य्रती आजारी पडली आणि त्यास किरकोळ ताप असेल तर थर्मामीटरच्या मदतीने त्याचा ताप जाणून घेता येतो. थर्मामीटरचा वापर केल्यानंतर तेसॅनेटाइझ करून सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. कारण थर्मामीटरच्या टोकावर पाणी सोडणे पुरेसे नाही. त्यास चांगल्यारितीने सॅनिटाइझ करणे आवश्यक आहे. निगा न राखल्यास चांगला व्य्रतीदेखील आजारी पडू शकतो.
 
थर्मामीटरचे टोक थंड पाण्याने धुवाः डिजिटल थर्मामीटरच्या टोकाला थंड पाण्याने धुणे चांगले आहे. वापरानंतर थर्मामीटर थंड पाण्यात एक-दोन मिनिटे ठेवावे. त्याने त्यावरील विषाणू निघून जातील. थर्मामीटर स्वच्छ करताना डिजिटल भागात जसे की डिस्प्लेत पाणी जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. डिजिटल थर्मामीटरच्या डिस्प्लेत पाणी गेल्यास खराब होऊ शकतो.
 
अल्कोहोल वाइप्सने स्वच्छ कराः अल्कोहोल आधारित वाइप्स किंवा रबिंग अल्कोहोलने थर्मामीटरला स्वच्छ करावे. अल्कोहोल वाइप्सने थर्मामीटरची सर्व बाजू स्वच्छ करा. तोंडात टाकण्यात येणारे थर्मामीटरचे टोकही चांगल्या रितीने स्वच्छ करा.
 
पाण्याने धुवाः संपूर्ण डिजिटल थर्मामीटर पाण्यात कधीही बुडवू नये. कारण त्यामुळे नुकसान होण्याची शक्यताच अधिक असते. हवेत वाळण्यासाठी सेट करा. कारण पुसण्यासाठी टॉवेलचा वापर केल्यास थर्मामीटरच्या अनेक भागांवरविषाणू राहण्याचा धोका वाढतो.
 
वापरानंतर पुन्हा प्रक्रिया कराः डिजिटल थर्मामीटरला चांगल्यारितीने सॅनिटाइझ करून विषाणूमु्रत करू शकतो. अस्वच्छ थर्मामीटर हे तापेबरोबरच अन्य आजारांनाही निमंत्रण देते. त्यात पोटदुखी, तोंड  येणे आदी.