सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (18:18 IST)

नवरात्रीत मधुमेह रुग्णांसाठी उपवास करणे धोकादायक तर नाही ?

नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपास करण्याची तयारी करत असणार्‍यांनी सर्वात आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे. मधुमेह असणार्‍या रुग्णांनी नवरात्री दरम्यान काय सावधगिरी बाळगली पाहिजे हे जाणून घेणे ही आवश्यक आहे.
 
टाइप 2 मधुमेह आजार असणारे नवरात्रीचा उपास ठेवू शकतात. परंतू याअगोदर डॉक्टराकडून आपल्या औषध संबंधी सल्ला घेतला पाहिजे. जर आपण टाइप 2 मधुमेह रुग्ण आहात तर आणि नवरात्रीचा उपास ठेवू इच्छित असाल तर उपास करण्यापूर्वी योग्य प्रमाणात गहू, डाळ, मेवे आणि प्रोटीनचा पुरवठा असणे आवश्यक आहे. आपण या सर्व वस्तूंचा योग्य प्रमाणात सेवन करत असल्यास शरीराला ऊर्जा मिळेल आणि आपल्यात उपास करण्याची ताकद मिळेल. या व्यतिरिक्त निर्जला व्रत ठेवू इच्छित असणार्‍यांनी व्रतापूर्वी फळांचे रस, भाज्या यांचे भरपूर प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे.
 
जास्त वेळ उपाशी राहणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. अशात मधुमेह रुग्णांचं शुगर लेव्हल गडबडू शकतं. अशात घाम फुटणे, कंपन येणे, हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्या येऊ शकतात. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी चुकूनही मिठाशिवाय उपवास ठेवू नका.
 
तसेच या दरम्यान तेलकट पदार्थ खाणे टाळा. जास्त प्रमाणात तेलाचे सेवन केल्याने इंसुलिनमध्ये समस्या उद्भवू शकते. उपास दरम्यान आपली शुगर लेवल तपासत राहा.