रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑगस्ट 2020 (10:17 IST)

कोरोना व्हायरस : वेगवेगळ्या भाज्यांना स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ या..

भाजीपाला आपल्या स्वयंपाकघरात येईपर्यंत बऱ्याच हातांमधून प्रवास करतो, अश्या परिस्थितीत स्वयंपाक करण्यापूर्वी त्यांना स्वच्छ करणे गरजेचे असते. आता आपण विचार करीत असाल की स्वयंपाक करण्याचा आधी भाजीपाला तर धुतला जातोच ? परंतु केवळ धुणेच पुरेसे नाही, कारण कोरोनाकाळात त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे झाले आहे.
 
चला तर मग जाणून घेऊ या की आपण वेग-वेगळ्या भाज्या आणि फळ कसे धुऊ शकतो जेणे करून त्यावरील कीटनाशके आणि जिवाणूंचा नायनाट होऊ शकेल. 
 
बटाटे आणि गाजर सारख्या भाज्या स्वच्छ करण्यासाठी आपण भाज्यांच्या ब्रश किंवा स्पॉन्जचा वापर करू शकता. त्याच प्रकारे आपण फळांमध्ये सफरचंद, काकडी, कलिंगड, डाळिंब आणि केळी देखील स्वच्छ करू शकता.
 
टोमॅटो आणि बियाणे वाले फळ पाण्याच्या हळू धारात धुवा आणि त्यांना हळुवार हाताने चोळून घ्या. या नंतर त्यांना कागदाच्या रुमालावर पसरवून वाळवून घ्या.
 
आता पानकोबी स्वच्छ कशी करावी ? यासाठी आपण सर्वप्रथम बाहेरची पाने काढून घ्यावी. त्यानंतर भाज्यांच्या ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करावं.
 
फ्लॉवर किंवा फुलकोबी आणि भेंडी स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी करून त्यामध्ये थोड्यावेळेसाठी त्यांना ठेवा  नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या.
 
पालक किंवा हिरव्या पालेभाज्या काही काळ एका भांड्यात कोमट पाण्यात काही मिनिटे ठेवा. नंतर गाळणीने त्यामधील पाणी काढून घ्या. या प्रकियेला किमान 1, 2 वेळा पुन्हा पुन्हा करावं.
 
भाज्या धुण्यासाठी मिश्रण तयार करावा 
 
बेकिंग पावडर आणि व्हिनेगर सम प्रमाणात घालून त्यात भाज्या टाकाव्या. पाण्याला कोमट करावं. काही काळ या भाज्यांना या मिश्रणात पडू द्या. या नंतर स्वच्छ पाण्याने भाज्यांना धुऊन आपण फ्रीज मध्ये ठेवू शकता.
 
मीठ, हळद, व्हिनेगर हे तिन्ही समप्रमाणात मिसळा. आता एका भांड्यात पाणी कोमट करावं. आता यामध्ये फळ आणि भाज्या 30 मिनिटे टाकून ठेवा, नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
 
मीठ आणि पाणी कोमट करून त्यात मीठ टाका. आता या घोळात भाज्या टाका आणि हाताने चोळून स्वच्छ करावं.