Daily Horoscope
✕

होळीचा रंग डोळ्यांत गेल्यास या चुका टाळा Eyes Safety Tips During Holi

Updated: सोमवार, 2 मार्च 2026 (15:49 IST)
 
१. डोळे थंड पाण्याने धुवा: 
सर्वात आधी स्वच्छ आणि थंड पाण्याने डोळे हलकेच धुवावेत. पाण्याचे हबके मारताना डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून रंग बाहेर पडेल. हे किमान ५-१० मिनिटे चालू ठेवा. पाण्याचा प्रवाह अती नसावा, कारण यामुळे कॉर्नियाला इजा होऊ शकते.
 
२. डोळे चोळू नका: 
रंग गेल्यावर डोळ्यांत टोचल्यासारखे वाटते, पण चुकूनही डोळे चोळू नका. चोळल्यामुळे रंगातील रासायनिक कण किंवा काचेसारखे सूक्ष्म कण बाहुलीला इजा  पोहोचवू शकतात.
 
३ स्वच्छ सुती कापडाने डोळे स्वच्छ करा: 
जर पाण्याने धुतल्यानंतरही तुमच्या डोळ्यांना काहीतरी चावत असेल तर ओल्या स्वच्छ, मऊ सुती कापडाने डोळ्यांचे कोपरे हळूवारपणे पुसून टाका. घाणेरडे हात किंवा रुमाल वापरणे टाळा, कारण यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
 
४. कॉन्टॅक्ट लेन्स काढून टाका: होळी खेळताना कधीही कॉन्टॅक्ट लेन्स घालू नका. जर रंग लेन्सच्या मागे गेला तर त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत, चष्मा घालणे हा एक चांगला पर्याय आहे. जरी तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स लावत असाल, तर त्या त्वरित काढून टाका. लेन्समध्ये रंग अडकून राहिल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
 
५. घरगुती पदार्थ टाळा: डोळ्यांत गुलाबपाणी, तेल, तूप किंवा कोणतेही घरगुती द्रावण टाकू नका. रंगात असलेली रसायने आणि या पदार्थांची प्रक्रिया होऊन त्रास वाढू शकतो.
 
डॉक्टरांकडे कधी जावे?
जर खालील लक्षणे जाणवत असतील, तर घरगुती उपाय करण्याऐवजी त्वरित नेत्रतज्ज्ञांकडे जा:
पाण्याने धुतल्यानंतरही डोळ्यांची जळजळ थांबत नसेल.
दृष्टी धूसर झाली असेल.
डोळा जास्त लाल झाला असेल किंवा सूज आली असेल.
डोळ्यांतून सतत पाणी येत असेल.
 
टीप: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही 'आय ड्रॉप्स' वापरू नका. होळी खेळण्यापूर्वी डोळ्यांच्या भोवती थोडे खोबरेल तेल, कोल्ड क्रीम किंवा व्हॅसलीन लावा आणि शक्य असल्यास सनग्लासेस वापरा. यामुळे रंग त्वचेला किंवा पापण्यांना चिकटणार नाही आणि तो सहज धुऊन जाईल.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख