मंगळवार, 6 डिसेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (10:28 IST)

मुलांना शाळेत पाठविण्याचा विचार करीत असाल, तर हे जाणून घ्या

आज सर्वत्र कोरोनाने उच्छाद मांडला आहे. कोरोना वॅक्सीनची वाट भारतच नव्हे तर इतर सर्व देश देखील अगदी आतुरतेने बघत आहे. जो पर्यंत कोरोनाची लस सर्व देशांना उपलब्ध होत नाही, तो पर्यंत सरकारसह आपल्या सगळ्यांची जवाबदारी आहे स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेण्याची.
 
या संरक्षणाखाली लहान मुले देखील येतात. आता सर्वत्र शाळा उघडण्याचे आदेश आले आहे. शाळा उघडल्यावर
मुलांची काळजी कशी घ्यावी हा एक मोठा प्रश्नच आहे. म्हणून त्यांचा सुरक्षितेसाठी आपण त्यांना शाळेत जाण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी शिकवाव्यात आणि सांगाव्यात. 
 
* मुलांना द्यावे सामाजिक अंतर राखण्याचे मंत्र -
शाळा सुरु होण्यापूर्वी मुलांना सामाजिक अंतर राखण्याचे महत्व समजावून सांगा. मुलांचे डेस्क लांब-लांब ठेवावे जेणे करून त्यांचामध्ये अंतर राहील.
 
* हात धुण्याची सवय -
मुलांना सांगावं की सिस्टम, दाराचे हॅण्डल, नळ सारख्या वस्तुंना हात लावल्यावर हात चांगल्या प्रकारे स्वच्छ करावे. मुलांना किमान 20 सेकेंदा पर्यंत हात चांगल्या प्रकारे धुण्याची सवय लावावी. या व्यतिरिक्त मुलांना हॅन्ड सेनेटाईझरचे वापर करण्याबद्दल सूचना द्या.
 
* मास्क वापरणे आवश्यक -
मुलांना समजावून सांगा की ज्या ठिकाणी सामाजिक अंतर राखणे शक्य नसेल तिथे कापड्याचा मास्क लावावा. आपल्या पाल्याचा बॅग मध्ये नेहमीच अतिरिक्त मास्क ठेवा जेणे करून त्याला मास्क बदलायचे असल्यास तो आरामात बदलू शकेल. आपल्या पाल्याला समजावून सांगा की आपले मास्क कोणासह देखील बदलायचे नाही.
 
* उष्ट खाणं टाळा -
मुलांना सांगावं की कोविड -19 मुळे शाळेत आपल्या मित्राचे किंवा कोणाचे ही उष्टे खाऊ नये.
 
 
* खोकताना किंवा शिंकताना आपल्या तोंडाजवळ रुमाल ठेवावा, जेणे करून, दुसऱ्यांना संसर्ग लागू नये.