गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (09:55 IST)

कोरोना काळात आनंदी राहणे इतकंही अवघड नाही, हे करून बघा

how to be happy during coronavirus pandemic
कोरोना काळात प्रत्येकाकडे एकतर जास्तीचे कामं आहेत किंवा काही कामच नाही... एखाद्याला कामाला वेळेवर पूर्ण करण्याचा ताण देखील आहे. 
 
कोरोना काळात मानसिक ताण होणं ही सामान्य बाब आहे. ताण आयुष्य नष्ट करतं, या पासून लांबच राहणे चांगले. म्हणूनच ताण दूर करण्यासाठीचे काही सोपे असे उपाय आज आम्ही आपणांस सांगत आहोत, आपण त्यांना आपल्या नित्यक्रमात समाविष्ट करावं.
 
* सूर्योदय होण्यापूर्वी उठा, फिरायला जा, हलका व्यायाम किंवा योग करा.
 
* सकाळी उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी किमान 15 मिनिटं तरी देवाचे ध्यान करा.
 
* स्वतःला ओळखा, आपले कौशल्य, क्षमता आणि मर्यादा ओळखा.
 
* नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांनी ऊर्जा नष्ट होते.
 
* जे आहे, त्यासाठी समाधानी राहा आणि कर्म करण्यात पूर्ण विश्वास ठेवा.
 
* उत्साह आणि आत्मविश्वासाने काम करा. व्यवस्थित नित्यक्रमाची सवय लावा.
 
* नेहमी वर्तमानात जगा, भूत आणि भविष्यकाळाची व्यर्थ काळजी करू नये. नेहमी आनंदी राहा, हसतं-हसतं जगणं शिका.
 
* साधे आणि सरळ जीवन जगावं. जीवनात गुणवत्तेवर विश्वास ठेवावा. देखावा करू नये. 
 
* छंद जोपासा. बोलण्यावर संयम ठेवा. संयम आणि आत्मसंयम राखा. कुटुंबीयांसह वेळ घालवावा.
 
* चांगले आरोग्य हे आयुष्याची सर्वोत्तम संपत्ती आहे. स्वतःची तुलना इतरांशी करणं टाळा. कमी पण खरे मित्र बनवा.
 
या सर्व गोष्टींना आपल्या जीवनात समाविष्ट करून त्याला अमलात आणणे सुरुवातीस त्रासदायक असू शकतं, पण काही काळांतरानंतर आपणांस वाटू लागेल की आपण तणाव रहित आणि समाधानी जीवन जगत आहात.