Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शॉपिंग मॉल जातायं... मग ही खबरदारी घ्या

Updated: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (11:03 IST)
 
* मॉल मध्ये गेल्यावर सर्वात आधी आपल्याला पार्किंग मध्ये जावं लागतं. आपण आपली गाडी तिथे लावत असताना तिथे कर्मचारी उभे असतात, जे बऱ्याच लोकांच्या संपर्कात येतात. अश्या परिस्थितीत आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की त्यांनी मास्क आणि ग्लव्ज घातले आहेत की नाही. जर पार्किंग मधल्या कर्मचार्‍यांनी मास्क आणि ग्लव्ज घातलेले नसतील तर त्यांना आपल्या गाडीला हात लावू देऊ नका.
 
* मॉल मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी लक्षात ठेवावं की थर्मल स्कॅनींग केल्या शिवाय मॉल मध्ये प्रवेश करू नये.
 
* मॉल मध्ये शारीरिक स्पर्श करणं टाळावं. मास्क आणि ग्लव्ज न वापरता जाऊ नये. आपल्याला या दोन्ही गोष्टींचा वापर करायचा आहे हे लक्षात ठेवावं.
 
* मॉल मध्ये प्रवेश करताना जर आपण रांगेत असाल तर लक्षात असू द्या की आपल्याला रांगेत असणाऱ्या लोकांशी योग्य अंतर राखायचे आहे.
 
* एस्केलेटर आणि लिफ्टचा वापर देखील काळजी पूर्वक करायचा आहे. एस्केलेटर वापरताना आपल्याला नेहमी एक पायरी सोडून उभारायचे आहे. लक्षात ठेवा की आपल्याला ग्लव्ज घालायचे आहे कारण एस्केलेटर चढताना आपण पट्टीला स्पर्श करता. या साठी आपल्याला ग्लव्ज घालणं महत्वाचं आहे. म्हणून ग्लव्ज न घालता एस्केलेटरच्या पट्टीला स्पर्श करू नये.
 
* लिफ्टचा वापर करताना हातात टिशू ठेवा. लिफ्टचं बटण हाताळताना टिशू वापरा नंतर या टिशुला फेकून द्या.
 
* लिफ्ट मध्ये सामाजिक अंतर राखा, अंतराच्या चिन्हांवरच उभारा.
 
मॉल मध्ये स्वछतागृह वापरताना कोणती काळजी घ्यावी ?
 
* सर्वात महत्वाचे म्हणजे की आपण मॉल मध्ये टॉयलेट जाणं टाळावं.
 
* जर आपण टॉयलेटचा वापर करत असाल तर आपल्या हातात टिशू ठेवावं आणि त्याचा साहाय्यानेच टॉयलेटचं दार बंद किंवा उघडा. 
 
* टॉयलेटचा वापर केल्यावर हात धुतल्यावर आपल्या हाताला स्वतःच्या सेनेटाईझरने सेनेटाईझ करावं.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

Colorful Coconut Rolls रक्षाबंधनाला बाजारातून आणण्यापेक्षा घरीच बनवा 'रंगीबेरंगी मिठाई'

Raksha Bandhan 2026 Wishes for Sister in Marathi बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan Wishes for Brother in Marathi 2026 भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

मधुमेह असताना लोणचे, पापड आणि चटणी खाणे योग्य का?

हॉटेल इंडस्ट्रीत करिअर करायचे आहे? फूड प्रोडक्शन कोर्स ठरेल फायदेशीर!

पुढील लेख
Show comments