मास्क लावणे जडं जातंय, आरोग्यावर दुष्परिणाम दिसून येत असल्यास उपाय जाणून घ्या
कोरोना व्हायरसने सर्वत्र उच्छाद मांडला आहे. गेल्या 6 महिन्यापासून माणसाचे सर्व आयुष्यच बदलून गेले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांचे जीवन जगण्याची पद्धतच जणू बदलून गेली आहे. मास्क लावणे, वारंवार हात धुणे, स्वतःला आणि वस्तूंना सेनेटाईझ करणे, आणि सामाजिक अंतर राखणे या सर्व सवयी आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटकच झाल्या आहेत.
आज लोकं या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी घरातून निघण्यापूर्वी मास्क लावणं विसरत नाही. तज्ज्ञाच्या मतानुसार कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क लावणे सर्वात सोपे आणि चांगले उपाय आहे. मास्क हवेत पसरणारे विषाणूंना आपल्या डोळ्यात, नाकात आणि तोंडात प्रवेश करून संक्रमित होण्यापासून वाचवतं.
बऱ्याच अभ्यासानुसार मास्क वापरल्याने 50% पर्यंत संक्रमणाचा धोका कमी होतो. या कारणास्तव लोकांना घरातून बाहेर पडण्यापूर्वी मास्क वापरण्याचा आणि घालण्याचा सल्ला दिला जात आहे. तथापि, लोकं तासनतास मास्क घातल्यामुळे होणाऱ्या असुविधेमुळे देखील अस्वस्थ आहेत. यामध्ये चेहऱ्यावर मुरूम येणं, ताण येणं, चष्म्यावर वाफ येणं आणि आता घास खवखवणे देखील समाविष्ट झाले आहेत.
बऱ्याच काळ किंवा घाणेरडे मास्क चेहऱ्यावर लावल्याने बऱ्याच जणांनी घसा दुखण्याची तक्रार केली आहे. चला जाणून घेऊया याचे कारण आणि त्यासाठीचे काही उपाय.
घाणेरडा मास्क आणि घशात खवखवणे -
कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी ज्याप्रमाणे वारंवार हात धुणं, कपडे बदलणं आणि इतर गोष्टींना स्वच्छ ठेवण्याची गरज असते त्याच प्रमाणे विषाणू आणि जंतूंच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी मास्क नियमानं धुणं देखील आवश्यक आहे. विषाणू, जंत, धूळ आणि ऍलर्जी हे सर्व काही मिळून घशात खवखव सारख्या समस्या उद्भवू शकतात. बऱ्याच काळ मास्क न धुता वापरल्यानं याचा वर विषाणू जमा होतात. हेच विषाणू घशात शिरून जळजळ आणि ताण निर्माण करतात. ज्या लोकांची प्रतिकारक शक्ती कमकुवत असते किंवा ज्यांना धुळीच्या कणांची ऍलर्जी असते त्यांना ह्याचा धोका सर्वात जास्त असतो.
या व्यतिरिक्त जेव्हा लोकं मास्क लावून एखाद्याशी बोलतात तर त्यांना आपली गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरात बोलावं लागतं. ज्यामुळे घशावर ताण पडतो, जेणे करून घशात जळजळ किंवा खवखव होऊ शकते.
संरक्षणासाठी काय करावं -
कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी हातांना धुण्या सारखेच महत्त्वाचे आहे मास्कला धुणं. मास्क दरवेळी वापरल्यानंतर त्याला गरम पाणी आणि साबणाने धुवावे. मास्क वापरण्यापूर्वी त्याला कडक उन्हात वाळू द्या. याच कारणामुळे प्रत्येकाला दोन मास्क ठेवण्याचा सल्ला दिला आहे जेणे करून आपण मास्क आलटून पालटून वापरू शकता. तसेच आपल्या मास्कला वारंवार स्पर्श करणं टाळावं. हे घालण्याच्या पूर्वी आणि याला काढल्यावर आपले हात स्वच्छ धुवावे.