शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (16:38 IST)

आरोग्यदायी आयुष्यासाठी आपल्या आहारामध्ये या 10 गोष्टींचा समावेश करा

प्रत्येकाला निरोगी राहावंस वाटत असते. निरोगी राहण्यासाठी सगळे लोक आपापल्यापरीने काही न काही करीत असतात. व्यायाम करतात, योगा करतात, तसेच पोषक घटक असलेले आहार घेतात. जेणे करून ते निरोगी राहावे. निरोगी आयुष्यासाठी निरोगी आहार खूप महत्त्वाचा आहे, ज्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जेची पातळी उंच राहील, म्हणून आपल्या आहारात पौष्टिक आहाराचा समावेश करणे फार महत्त्वाचे आहे. या लेखात आम्ही आपल्याला अश्या काही 10 खाद्य पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. 
 
1 बदाम - 
निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी आपल्या आहारात बदामांचा समावेश करावा. बदामामध्ये प्रथिनं मुबलक प्रमाणात आढळतात. याचा नियमित सेवनानं आपले आरोग्य चांगले राहतात.
 
2 डाळी -
बऱ्याच आरोग्यवर्धक गुणधर्मांनी भरलेल्या डाळी आपल्या आरोग्यास खूप महत्त्वाची आहे. याचे नियमित सेवन करायला हवे जेणे करून आपल्या शरीरास योग्य असे पोषण मिळू शकेल.
 
3 सोया-
सोया हे हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी सहायक असतं. हे प्रथिनांचं चांगलं स्तोत्र आहे. म्हणून ह्याचा आपल्या आहारात आवर्जून समावेश करावा. 
 
4 संत्री - 
संत्र्यात व्हिटॅमिन सी आढळतं आणि याचा सेवनानं आपण अनेक प्रकारच्या आजारापासून दूर राहता. इतकेच नव्हे तर ते हे आपल्या आरोग्यासह आपले सौंदर्य वाढविण्याचं काम करतं. या मध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट आपल्या त्वचेला उजळतो त्याच बरोबर आपल्या चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यास उपयुक्त ठरू शकतात.
 
5 लसूण -
लसूण आपल्या जेवणाची चव वाढवतं, तसेच आपल्याला ह्याचे नियमित सेवन आपल्याला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवत. ह्याचा नियमित सेवनाने आपली प्रतिकारक शक्ती देखील वाढते. या मुळे मधुमेहाचा धोका कित्येक पटीने कमी करू शकतो. ह्याला दररोज सकाळी अनोश्यापोटी पाण्याने घेऊ शकता.
 
6 कोथिंबीर - 
कोथिंबीर वेगवेगळ्या पदार्थात वापरली जाते. कोथिंबिरीमध्ये पचन शक्तीला सुदृढ करण्यासह रक्त प्रवाह व्यवस्थित राखण्याचे गुणधर्म असतात. म्हणून आपल्या आहारात कोथिंबीर आवर्जून समाविष्ट करावी.
 
7 अ‍ॅव्होकॅडो - 
अ‍ॅव्होकॅडो अश्या पोषक गुणधर्मांनी समृद्ध असतो, जे आपल्याला निरोगी तर बनवतेच त्याच बरोबर हे उच्च रक्तातील पातळीला कमी करण्यास मदत करते. कोलेस्टेरॉल संतुलित करण्यास मदत करते. म्हणून आपण या फळाला आपल्या आहारात आवर्जून समाविष्ट करावा, जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं ठरेल.
 
8 मश्रुम - 
मश्रुमची भाजी चविष्टच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे, कारण या मध्ये असलेले पोटॅशियम ची मात्रा आपल्या स्नायूंना तर निरोगी ठेवतेच, त्याच बरोबर रक्त दाबला कमी करण्यास सक्रियपणे मदत करते.
 
9 पालक - 
पालक प्रामुख्यानं हिरव्या पालेदार भाज्यांमध्ये समाविष्ट केली जाते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पालक आपल्या प्रतिकारक शक्तीला बळकट करण्यात आपली सक्रिय भूमिका बजावते.
 
10 अंडी -
अंड्यांचे सेवन आपण न्याहारी म्हणून देखील करू शकता. वास्तविक अंड्यांमध्ये प्रथिनं मुबलक प्रमाणात असतात. या सह अंड्यात सेलेनियम, व्हिटॅमिन डी, झिंक,आयरन, आणि कॉपर सारखे पोषक घटक आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.