शुक्रवार, 27 जानेवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (13:24 IST)

कोरोनाच्या विरुद्ध प्रतिकारक शक्ती वाढवायची असल्यास याचे आवर्जून सेवन करा

कोरोनाच्या विरुद्ध प्रतिकारक शक्ती वाढवायची असल्यास एक वस्तू अशी आहे ज्याचे आवर्जून सेवन करावे. लसणाचे नियमाने सेवन केल्याने हे रोग प्रतिकारक शक्तीला वाढविण्यात मदत करतं. 
 
योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात लसणाचे सेवन केल्याने शरीरावर विषाणू, जिवाणू किंवा बुरशीजन्य संसर्गाचा सहज परिणाम होतं नाही. 
 
जर रोग प्रतिकारक शक्ती बळकट असेल तर कोरोना विषाणूंचा परिणाम देखील शरीरावर कमी होणार किंवा कदाचित होणार देखील नाही. म्हणून आपल्याला दररोज योग्य प्रमाणात लसूण घेतले पाहिजे. 
 
आपण कच्चं लसूण देखील देखील खाऊ शकता. तसे शक्य नसल्यास लसणाची चटणी करुन खावी. 
 
लसूण आपल्या शरीरातील हानिकारक घटकांना दूर करण्याचे काम करतं आणि त्याच बरोबर हे रक्तदाब कमी करतं. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी लसूण खूप फायदेशीर आहे, परंतु कमी रक्तदाब असणाऱ्यांनी लसणाचं सेवन कमी प्रमाणात करावं. किंवा घेण्यापूर्वी वैद्यकीय परामर्श घ्यावा.