शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 18 मे 2020 (11:02 IST)

अनुलोम विलोम म्हणजे काय ? हे घरी कसे करावे ?

प्राणायामाची सुरुवातीची क्रिया आहे अनुलोम आणि विलोम. यामुळे मेंदू मध्ये प्राणवायू ऑक्सिजनची पातळी वाढते. यामुळे फुफ्फुसं बळकट होतात. कोरोनाच्या संसर्गाच्या काळात आपले फुफ्फुस बळकट असणे गरजेचे आहे. जाणून घेऊ या अनुलोम विलोम प्राणायाम कसे करावे....
 
प्राणायाम करताना 3 क्रिया करतात. 
1 पूरक, 
2 कुंभक, 
3 रेचक 
ह्यालाच हठयोगी अभ्यानंतर वृत्ती, स्तंभ वृत्ती आणि बाह्य वृत्ती असे ही म्हणतात. हेच अनुलोम आणि विलोम आहे. नाडीशोधन प्राणायामाची ही सुरुवातीची क्रिया असे.
 
1 पूरक - नियंत्रित वेगाने श्वासाला आत घेण्याची क्रिया पूरक असे. श्वास आत घेताना किंवा बाहेर सोडताना दोन्ही वेळेस त्यामध्ये लय आणि अनुपात असणे गरजेचे असते.
 
2 कुंभक - आत घेतलेल्या श्वासाला क्षमतेनुसार रोखून धरण्याच्या प्रक्रियेला कुंभक म्हणतात. श्वास आत रोखण्याची क्रिया आंतरिक कुंभक आणि श्वासाला बाहेर सोडून काही वेळ थांबण्याची क्रियेला बाह्य कुंभक म्हणतात. यामध्ये देखील लय आणि अनुपात असणे गरजेचे आहे.
 
3 रेचक - आत घेतलेल्या श्वास हळुवारपणे सोडण्याच्या क्रियेला रेचक म्हणतात. यामध्ये श्वास घेताना आणि सोडताना दोन्ही वेळेस लय आणि अनुपात असायला हवं.
 
फायदे : सर्व प्रकारचे ताण तणाव कमी करून शांती देणाऱ्या या प्राणायामामुळे शरीराच्या सर्व नाड्यांना लाभ मिळतो. डोळे सतेज होतात, रक्त पुरवठा सुरळीत होतो. निद्रानाशाचा त्रास असल्यास त्यासाठी पण हे फायदेशीर आहे. त्याचबरोबर मेंदूचे सर्व विकार दूर करण्यासाठी सक्षम आहे. या प्राणायामामुळे फुफ्फुसात साचलेली घाण बाहेर निघते आणि फुफ्फुस बळकट बनतात. किमान 10 मिनिटे अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने डोकेदुखीच्या आजारापासून मुक्ती मिळतो. नकारात्मक विचारांपासून मन दूर होऊन आनंद आणि उत्साहात वाढ होते.