मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (09:05 IST)

तुळशीचे गुणधर्म आणि त्याचा वापर करण्या संबंधी माहिती जाणून घेऊया

आपल्या संस्कृतीमध्ये तुळशीचं सेवन फार चांगले आणि फायदेशीर मानले गेले आहेत, पण तुळशीचा वापर करावा तरी कसा- म्हणजे तुळशी गिळावी की चावून चावून खावी?
 
आपल्या आयुर्वेदात तुळशीचं फार महत्त्व आहे. तुळस अशी वनस्पती आहे. ज्याची पूजा शतकानुशतके केली जात आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्यते मध्ये तुळशीचा वापर पूजेसाठी करण्या व्यतिरिक्त आयुर्वेदात देखील आजारांपासून वाचण्यासाठी केला जातो. रक्तातील साखरेच्या पातळी पासून प्रतिकारक क्षमतेपर्यंत तुळशीचे बरेच फायदे आहेत. 
 
तुळशीचे फायदे -
* तुळशीमध्ये अँटी बेक्टेरिअल गुणधर्म असतात. सर्दी- पडसं पासून वाचण्यासाठी तुळस ही वर्षानुवर्षे वापरण्यात येते.
* तुळशीत अँटी बेक्टेरिअल आणि अँटिमायक्रोबियल गुण असतात ज्या मुळे तुळशी श्वासाच्या येणाऱ्या दुर्गंधाला दूर करण्यात साहाय्य करते.
* तुळस ही कार्ब्स आणि फॅट्स मेटॅबॉलिझम वाढवते जी आपल्या रक्तामधील साखरेची पातळी कमी करते.
* पचन संस्थेसाठी देखील तुळशी फायदेशीर आहे. तुळस ही ऍसिड रिफ्लेक्सला संतुलित करून आपल्या पचन संस्थेला सुधारते. 
* तुळशी ही कर्करोग होण्याची शक्यता कमी करते. विशेषतः तोंडाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. 
 
तसेच तुळस चावल्यानं काही नुकसान देखील होऊ शकतं असं वारंवार सांगण्यात येत आहे. संशोधनात देखील आढळून आले आहे की तुळस चावू नये. असे केल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात. 
 
1 दातांना इजा होऊ शकते- 
तुळस चावल्यानं दातांचा रंगावर परिणाम होतो. शास्त्रज्ञ सांगतात की तुळशीच्या पानात थोडक्या प्रमाणात आर्सेनिक असतं. आपण पान चावल्यावर हे तोंडात असलेल्या ळालीत मिसळून जातं. यामुळे आपल्याला दात किडणे, हिरड्यात त्रास होणं सारखे त्रास होऊ शकतात. 
 
2 गरोदर बायकांसाठी हानिकारक -
आपण गरोदर असल्यास आणि बाळाला दूध पाजत असल्यास तुळस अजिबात खाऊ नये. संशोधनानुसार जर आपण तुळस गरोदरपणे घेत असल्यास आपल्या गर्भाशयात अ‍ॅस्ट्रॅगॉलचे प्रमाण वाढते ज्यामुळे संकुचन होत आणि गर्भपात देखील होऊ शकतं.
 
3 लिव्हरवर दुष्परिणाम होतो- 
WHO च्या मतानुसार जी व्यक्ती एस्टामिनोफेन सारखे औषध आणि त्याच बरोबर तुळस देखील घेतात त्यांना लिव्हरसंबंधी समस्या उद्भवू शकतात.
 
4 जनन क्षमतेवर परिणाम होतो - 
तुळशीच्या पानाचे सेवन केल्यानं स्त्री आणि पुरुष त्यांचा जनन क्षमतेवर परिणाम होतो. वंध्यत्व सारखी समस्या सामोरी येते. तुळशीत प्रजनन हार्मोन्स कमी करण्याची क्षमता असते.
 
आपल्या संस्कृतीत तुळशीचे सेवन करणं हे लाभदायी मानले आहे, परंतु तुळस ही चावायची नसून नेहमी गिळण्याचा सल्ला दिला जातो. 
 
तुळस घेण्याची योग्य पद्धत -
1 तुळशीचा चहा - आलं, वेलचीचा चहा आपण सर्वांनी घेतलाच असणार. पण आपण कधी तुळशीचा चहा घेतला आहे का? तज्ज्ञांच्या मते तुळस चावणं धोकादायक 
आहे. या साठी आपण तुळस नेहमी चहात घ्यावी. ही आपल्या आरोग्यास लाभदायी असते आणि आपल्या प्रतिकारक शक्तीला बळकट करते. 
 
2 तुळशीचा काढा - स्वतःला निरोगी राखणं सर्वात मोठी जबाबदारी आहे, अश्या परिस्थितीत तुळशीचा काढा घेणं आपल्या आरोग्यासाठी लाभदायी असेल. 
कोणत्याही गोष्टीची अती नेहमीच त्रासदायक असते. अश्या परिस्थितीत तुळशीचे जास्त सेवन केल्यानं हे आपल्या आरोग्यास हानिकारक असू शकतं आणि आपल्या पचन क्षमतेला देखील कमकुवत करू शकतं.