suvichar

वयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील बळकट..

Updated: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (17:53 IST)
 
सार्कोपेनियामुळे ग्रस्त असल्यास स्थिती आणखीनच खराब होते, ज्यामुळे स्नायूंचे नुकसान होते.
 
वृद्धत्वेंमुळे, स्नायू कमकुवत होतात. या स्थितीला सार्कोपेनिया म्हणतात. शरीरासाठी प्रथिनं खूप महत्त्वाची असतात. शरीरातील प्रत्येक सजीव पेशींसाठी प्रथिनं आवश्यक असतात. हे प्रामुख्याने अमिनो आम्लाने बनलेले असतात. पेशींना ऊर्जा देतात. सकाळच्या न्याहारी आणि दुपारच्या जेवणात संतुलित प्रमाणात प्रथिनं घेणं फायदेशीर असत. या मुळे वयोवृद्ध लोकांच्या स्नायूंना वाढत्या वयाप्रमाणे बळकट ठेवण्यास मदत मिळते.
 
एका संशोधनानुसार वृद्धांमध्ये प्रथिनं त्यांच्या एकूण कॅलरीच्या प्रमाणात 30 ते 35 टक्के असावं. तसेच दुसरीकडे सार्कोपेनिया ने ग्रस्त असलेल्या एका प्रौढ व्यक्तीला दररोज 25 ते 30 ग्रॅम प्रथिनांची गरज असते.
 
प्रथिनं मध्ये योग्य पोषक घटकाची योग्य आवृत्तीची निवड करणं देखील महत्त्वाचे असते. ल्युसीन नावाचे अमिनो ऍसिड निवडावं. या साठी सर्वात उत्कृष्ट स्रोत म्हणजे मासे, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहे. हे सोयाबीन, इतर बीन्स, शेंगदाणे आणि इतर बियाणांपासून मिळवता येत. यात उच्च प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश असू शकतो.
 
शेंगा : हे भाज्यांचे वर्ग आहे, यात सोयाबीन, मटार आणि डाळी आहेत. ते सर्वात पौष्टिक खाद्य पदार्थांमध्ये एक आहेत. हे प्रथिनं चे चांगले स्रोत आहे. शेंगा हे शाकाहारींसाठी मांसाहाराचे एक स्वस्थ पर्याय असू शकत. या मध्ये चरबी आणि कॉलेस्ट्राल जास्त प्रमाणात असत.
 
सॅल्मन मासे : सॅल्मन मासे ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि प्रथिनांचे चांगले स्रोत आहे. या मध्ये कमी चरबी असते. हे आरोग्यास फायदेशीर असतं. मासात विविध प्रकारांचे व्हिटॅमिन, खनिजे आणि इतर अन्य पोषक तत्त्व आढळतात. म्हणून मासांचे सेवन शरीराच्या गरजांना पूर्ण करतं.
 
अंडी : एका अंड्यात साधारणपणे 6 -7 ग्रॅम प्रथिनं असतं, बरेच लोकं असं समजतात की प्रथिनं हे फक्त अंड्यांच्या पांढऱ्या भागातच असतं, पण अंड्याचा पिवळ्या भागात सर्व पोषक तत्त्व आणि चरबी आढळते. अंडी प्रथिनांच्या व्यतिरिक्त कॅल्शियम आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे देखील स्रोत आहेत.
 
दही : दही प्रथिनांचे एक उत्तम स्रोत आहेत प्रथिनांच्या प्रत्येक कमतरतेची पूर्णता करण्यास हे खूप प्रभावी आहे. हे माणसाचे वय वाढविण्यास मदत करतं.
 
कॉटेज चीज : कॉटेज चीज मध्ये चरबी आणि कॅलरी कमी असतात. हे प्रथिनांचा चांगला स्रोत असण्या व्यतिरिक्त, अश्या प्रकारच्या चीज मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन बी 12 आणि इतर पोषक घटक असतात.
 
टीप : रोगाच्या निदानासाठी दिलेल्या माहितीचा वापर तज्ज्ञांचा सल्ल्याशिवाय करू नये.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments