Festival Posters
✕

या पांढऱ्या गोष्टी वजन वाढवतात, लठ्ठपणा कमी करण्यासाठी या काळ्या गोष्टी खा

Updated: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (16:35 IST)
 
ब्राऊन राईस किंवा ब्लॅक राईस- वजन कमी करताना ही तुम्ही भात खाऊ शकता, पण तुमच्या जेवणात ब्राऊन राईस किंवा ब्लॅक राईसचा समावेश करावा. काळ्या तांदळात भरपूर प्रमाणात एन्थोसायनिन्स असतं ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. हे एक अँटिऑक्सिडेंट आहे ज्याने जळजळ कमी होते. काळ्या तांदळात भरपूर फायबर आणि पोषक तत्व असतात. याचे सेवन केल्याने टाईप 2 मधुमेहाचा धोकाही कमी होतो. हे तांदूळ खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहतं .
 
काळा लसूण- जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर काळा लसूण वापरा. याची खास गोष्ट म्हणजे त्यामध्ये पांढऱ्या लसणापेक्षा दुप्पट अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. काळा लसूण खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. याने कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
 
काळे अंजीर- काळ्या अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्याने रक्तदाब कमी होतो. काळ्या अंजीरमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होते. काळे अंजीर खाल्ल्याने शरीराला कर्करोगाशी लढण्याची क्षमता मिळते असे देखील संशोधनांमध्ये आढळून आले आहेत.
 
ब्लॅक टी- ब्लॅक टी मध्ये आढळणारे पॉलीफेनॉल पेशींचे नुकसान कमी करतात. हे फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. सोबतच ब्लॅक टी वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत होते. ब्लॅक टी नियमित प्यायल्याने लठ्ठपणा आणि मधुमेह कमी होतो.
 
ब्लॅक बेरी- ब्लॅक बेरीमध्ये भरपूर पोषक तत्वे आढळतात. याने मासिक पाळी नियमित होऊ शकते. शिवाय जळजळ कमी होते आणि त्वचा चांगली होते.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

नवरात्री स्पेशल फराळ थाळी: एकाच वेळी बनवा ४ चविष्ट उपवासाचे पदार्थ

कर्करोगाचे निदान झाल्यावर रुग्णांनी काय करावे?

LLM फॅमिली लॉमध्ये करिअर करण्याची संधी! पात्रता, अभ्यासक्रम, टॉप कॉलेजेस आणि पगार जाणून घ्या

नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी ९ पारंपरिक लुक्स आणि स्टायलिंग टिप्स

रेबीज प्राणघातक ठरू शकतो; वेळेत उपचार आणि योग्य खबरदारी का महत्त्वाची?

पुढील लेख
Show comments