मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 26 जानेवारी 2022 (17:24 IST)

या गोष्टी लिव्हरच्या शत्रू आहे, ह्याचे सेवन करणे टाळावे

शरीर निरोगी राहण्यासाठी चांगले पचन असणे आवश्यक आहे आणि पचन चांगले होण्यासाठी लिव्हर निरोगी असणे आवश्यक आहे. लिव्हर हा शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. पोट आणि आतड्यांमधून बाहेर पडणारे सर्व रक्त लिव्हर मधून जाते. लिव्हर रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकणे, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे आणि रक्त साकळणे नियंत्रित करणे यासारखी अनेक आवश्यक कार्ये करते. याशिवाय लिव्हर द्वारे पित्तही तयार होते. पित्त हा एक प्रकारचा प्रोटीन आहे जो चरबीचे फॅटी ऍसिडमध्ये विघटन करतो जेणेकरून ते पचले जाऊ शकतात. यामुळेच या अवयवामध्ये होणाऱ्या कोणत्याही आजाराचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो.आपल्या जीवनशैलीचा आणि आहाराचा थेट परिणाम लिव्हरच्या आरोग्यावर होतो. आपण जाणूनबुजून किंवा नकळत अशा अनेक पदार्थांचे सेवन करतो ज्यामुळे लिव्हरला हानी पोहोचते, अशा गोष्टींपासून आपण दूर राहिले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 तळलेल्या गोष्टी- जे लोक तळलेल्या वस्तूंचे अधिक सेवन करतात त्यांना लिव्हरशी संबंधित सर्व प्रकारच्या आजारांचा धोका असतो. तळलेल्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटचे सेवन केल्याने लिव्हरला त्याचे कार्य करणे कठीण होऊ शकते आणि कालांतराने लिव्हरच्या समस्या जसे की जळजळ आणि गंभीर प्रकरणांमध्ये, लिव्हर निकामी होऊ शकते. एकूण दैनंदिन कॅलरीजपैकी 10 टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटचे सेवन केले पाहिजे. 
 
2 अल्कोहोल चे सेवन करणे हानिकारक -लिव्हरसाठी, ज्या गोष्टी सर्वात हानिकारक मानल्या जातात, त्यात अल्कोहोल सर्वात वर आहे. अभ्यास दर्शविते की जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने लिव्हर मध्ये सूज येऊ शकते आणि गंभीर प्रकरणांमध्ये, सिरोसिस नावाचे आजार म्हणजे लिव्हरचे अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोलपासून दूर राहून आपण लिव्हरशी संबंधित अनेक गंभीर आजारांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.
 
3 कमी प्रमाणात मीठ खाणे- जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब तर वाढतोच पण ते लिव्हरसाठीही हानिकारक मानले जाते. लिव्हरचे आरोग्य राखण्यासाठी, आपण मिठाचे सेवन कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पाणी रिटेन्शन होऊ शकते. प्रोस्टेड पदार्थ आपल्या लिव्हरसाठी वाईट असतात कारण त्यामध्ये सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट दोन्ही जास्त असतात, त्यामुळे मिठाचे सेवन कमी करणे किंवा लांब राहणे हे लिव्हरला निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.