शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (00:00 IST)

COVID 19 साथीच्या काळात N-95 मास्क कसा घालावा, वापरण्यापूर्वी Tricks वाचा

देशात वाढत्या कोरोना संसर्गाच्या साथीनंतर आता त्याचे नवीन प्रकार Omicron पाय पसरत आहेत. अशा वेळी अधिक सावध राहण्याची गरज आहे. 
 
तज्ञांप्रमाणे एन-95 रेटिंग असलेले मास्क कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चांगली कामगिरी करत आहेत. तरी मास्क घेताना विशेष काळजी घ्यावी. मास्क योग्य आकाराचा असावा. तुमच्या नाकाला, तोंडाला व्यवस्थित बसवा हे समजून घ्या.

N-95 हा मास्क कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्वात सुरक्षित मास्क असल्याचे मानले जात आहे.
 
N-95 रेस्पिरेटर्स चेहऱ्याभोवती चांगले सील देण्यासाठी डिझाइन केलेले असून ते विशेषतः लहान कणांना फिल्टर करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. N-95 सामान्यत: 0.3 मायक्रॉन आकाराच्या श्वसन यंत्राच्या चाचणी कणांपैकी 95% अवरोधित करते.
 
N-95 कसे वापरावे आणि N-95 मास्क ला निर्जंतुकीकरण कसे करावे
N-95 मास्क अनेक वेळा वापरला जाऊ शकतो.वापरात नसताना तो सुरक्षितपणे संग्रहित करावा. स्वच्छ प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवावा. मास्क 3-4 दिवस कोरड्या वातावरणात ठेवल्याची खात्री करा.

N-95 मास्क डिसइंफेक्ट करण्याचा दुसरा उपाय स्टरलाइज करणे.